महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वडिल उमेदवार, कन्येला विजयी करा असा कॉल

05:26 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यप्रदेशच्या निवडणुकीतील अनोखे प्रकरण

Advertisement

मध्यप्रदेशच्या बालाघाट मतदारसंघातील मतदार सध्या गोंधळात पडले आहेत. बालाघाटचे भाजप उमेदवार गौरीशंकर बिसेन आणि काँग्रेसचे उमेदवार अनुभव अंजारे निवडणुकीच्या मैदानात आहेत, परंतु मतदानासाठी जे फोन कॉल येत आहेत, त्यात भाजप उमेदवाराचे नाव दुसरेच सांगण्यात येत आहे.

Advertisement

भाजप उमेदवाराला मतदान करा असे आवाहन करणाऱ्या कॉलमध्ये उमेदवाराचे नाव मौसम बिसेन सांगण्यात येत आहे. तसेच पहिल्या क्रमांकाचे बटन दाबून मौसम बिसेन यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्वेक्षण कंपन्यांच्या या फोन कॉल्समुळे मतदारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तर भाजपच्या नेत्यांना याची माहिती कळताच त्यांनी यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

गौरीशंकर बिसेन यांनी स्वत:ची कन्या मौसम यांना भाजपची उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. भाजप नेतृत्वाकडून बालाघाट मतदारसंघात मौसम बिसेन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु काँग्रेसकडून दिग्गज नेते अनुभव मंजारे यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपने स्वत:चा उमेदवार बदलला होता. भाजपने पुन्हा मंत्री गौरीशंकर बिसेन यांनाच तिकीट दिले. परंतु मौसम यांनीही अर्ज भरला होता, जो फेटाळला गेला. अनुभव मंजारे यांचे तगडे आव्हान बिसेन यांच्यासमोर आहे. मंजारे यांच्यामुळेच गौरीशंकर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article