पाकमधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे भवितव्य अधांतरी
‘पीसीबी’चा ‘हायब्रिड मॉडेल’ला नकार,
वृत्तसंस्था/दुबई
भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिलेला असूनही पाकिस्तानने पुढील वर्षी होणार असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात ‘हायब्रिड’ मॉडेलचा विचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ अडचणीत सापडले असून चॅम्पियन्स ट्रॉफीचे बहुप्रतिक्षित वेळापत्रक ठरविण्यासाठी आयसीसी मंडळाची आज शुक्रवारी बैठक होणार आहे. पाकिस्तानमध्ये संघ न पाठवण्याचा भारताचा निर्णय आणि पीसीबीची हायब्रिड पद्धतीला मान्यता न देण्याची भूमिका यामुळे या स्पर्धेचे भवितव्य अधांतरी झाले आहे.
या टप्प्यावर हायब्रिड हा सर्वोत्तम पर्याय आहे. आम्हाला आशा आहे की, स्पर्धेशी निगडीत सर्व बाजू या स्पर्धेच्या भल्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतील. भारत आणि पाकिस्तानविना ही स्पर्धा होणे चांगले नाही, असे एका सूत्राने सांगितले. भारत विऊद्ध पाकिस्तान सामन्याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीची सर्व चमक जाईल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात आर्थिक परिणाम होतील, हा मुद्दा पीसीबीच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न आयसीसी सदस्यांकडून चालला आहे.
ब्रॉडकास्टर जिओ स्टारने आधीच वेळापत्रकाच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यास उशीर झाल्याबद्दल आपली निराशा व्यक्त करण्यासाठी आयसीसीच्या उच्च पदस्थांशी संपर्क साधलेला आहे. आयसीसी आणि ब्रॉडकास्टर यांच्यातील करारानुसार, प्रशासकीय मंडळाने स्पर्धेचे वेळापत्रक किमान 90 दिवस अगोदर देणे अपेक्षित होते. त्या मुदतीचा भंग झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा शेजारील देशाचा दौरा टाळण्यासाठी स्पर्धेच्या साखळी टप्प्यात भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्याच्या शक्यतेवर सदस्य चर्चा करतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘मला वाटत नाही की, टेलिव्हिजन हक्कधारक ते मान्य करतील.