शेतकरी आंदोलन चिघळले! हरियाणा पोलिसांशी झालेल्या झटापटीत 24 वर्षीय आंदोलकाचा मृत्यु
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या एका 24 वर्षीय आंदोलकांचा खनौरी सीमेवर हरियाणा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यु झाला. शुभ करण सिंग या तरुण शेतकऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी पळवले असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला, यासंदर्भाची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. 13 फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या आंदोलनामध्ये पंजाब राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली असून आंदोलकांना पंजाबमधून हरियाणामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
केंद्राविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची पहील्या फेरीतील सरकारबरोबरची बोलणी फिस्कटल्याने आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. पण त्यानंतर आज एका तरूण आंदोलकाच्या मृत्यूबाबत रुग्णालयाकडून जाहीर करण्याआधी, हरियाणा पोलिसांनी शंभू सीमेवर झालेल्या चकमकीत एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नसल्याचा दावा विविध माध्यमांद्वारे करण्यात आला आहे.
यावर आपल्या अधिकृत X य़ा सोशल मिडीया अकाउंटवर माहीती देताना हरियाणा पोलीसांनी ही अफवा असल्याचं म्हटलं आहे. "ही एक फक्त अफवा आहे. दाता सिंग- खनौरी सीमेवर दोन पोलिस आणि एक आंदोलक जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत,"
काल केंद्रीय नेत्यांसोबत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यासंदर्भात चर्चा केली. अनेक फेऱ्यांनंतरही हरियाणा पोलिसांनी लावलेले अडथळे तोडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्याने खनौरी सीमा आणि शंभू सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण झाली. त्यामुळे आंदोलकांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.