For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेडणे येथील प्रसिद्ध पुनव आज

12:42 PM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
पेडणे येथील प्रसिद्ध पुनव आज
Advertisement

गोव्यासह कर्नाटक, महाराष्ट्रातून येणार लाखो भाविक : आयोजनसाठी देवस्थानांसह सरकारी यंत्रणाही सज्ज

Advertisement

पेडणे : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवी श्रीभगवती, देवी श्रीसातेरी व देव श्रीरवळनाथ यांची पेडणेची सुप्रसिद्ध पुनव आज गुऊवार दि. 17 रोजी साजरी होत आहे. गोवा, महाराष्ट तसेच कर्नाटक राज्यातही देवी श्रीभगवती, देवी श्रीसातेरी व देव श्रीरवळनाथ यांचे भक्तगण लाखोंच्या संख्येने असून आपल्या देवाचा कौल घेण्यासाठी ते पेडणेत दाखल झाले आहेत. पेडणे शहरासह संपूर्ण तालुक्यात चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. पुनवेची जोरदार तयारी पूर्ण झाली असून श्रीभगवती मंदिर परिसर विविध प्रकारचे स्टॉल्स तसेच फुले, केळी, खेळणी, मिठाई दुकाने, फर्निचर, भांड्यांची दुकाने, मनोरंजनाचे खेळ, चणे व खाजांची व अन्य दुकानांनी परिसर फुलून गेला आहे. मोठ्या संख्येने भाविक आपल्या देवीची खणा नारळांनी ओटी भरण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून पेडणेत दाखल होत आहेत. तसेच कौल आणि दर्शन घेण्यासाठी भाविक मोठया संख्येने येत आहेत.

उत्साह, भक्तिभावाची पर्वणी

Advertisement

पेडणेची पुनव ही सर्व भाविकांसाठी एक उत्साह देणारी पर्वणी आहे. उत्सव यशस्वीपणे साजरा व्हावा, यासाठी सरकारी यंत्रणाही सज्ज झाली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसबळ तैनात करण्यात आले आहे. हजारो वाहनांतून लाखो लोक शहरात दाखल होणार असल्याने वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. पेडणेचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे, उपअधीक्षक जीवबा दळवी तसेच खास पुनवेसाठी तैनात करण्यात आलेले पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत.

Advertisement
Tags :

.