कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुळसचा प्रसिद्ध जैतीर उत्सव २६ मे रोजी

10:36 AM May 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

दक्षिण कोकणची काशी समजला जाणारा आणि लाखो भक्तांचा तारणहार असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचा माहेरवाशिणींचा देव म्हणून ओळखला जाणारा श्रीदेव जैतीरचा उत्सव यावर्षी वैशाख कृ . अमावास्या सोमवार दि. 26 मे रोजी संपन्न होणार असून या उत्सवाची सांगता कवळास उत्सवाने बुधवार दि. 4 जून रोजी होणार आहे.यावर्षी बऱ्याच कॅलेंडरमध्ये दि. 27 मे रोजी अमावस्या असल्याने भक्तगणांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे देवस्थान मानकरी आणि देवस्थान उपसमिती मार्फत श्रीदेव जैतीर देवतेच्या उत्सवाची तारीख भाविकांना समजावी यासाठी प्रसार माध्यमातून जाहीर करण्यात येत आहे.
सलग 11 दिवस चालणाऱ्या या उत्सवात शेती अवजारे ,वटपौर्णिमा साहित्य, खेळणी, मालवणी खाजे, हॉटेल्स, थंडपेय तसेच विविध वस्तूंचा बाजार भरतो. तसेच भाविकांच्या शंका, पडस्ताळे आदींचे निरसन केले जाते . या उत्सवास सिंधुदुर्ग जिल्हयाबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक आणि गोव्यातून भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. प्रतिवर्षी प्रमाणे होणाऱ्या श्रीदेव जैतीर देवतेच्या उत्सवाचा तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी आणि सोमवार दि. 26 मे रोजी होणाऱ्या श्री देव जैतीर उत्सवाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, तुळस यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article