For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्या कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव

05:19 PM Mar 18, 2025 IST | अनुजा कुडतरकर
उद्या कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव
Advertisement

अवसारांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचा आगळावेगळ्या व वैशिष्टपूर्ण हुडोत्सव बुधवारी १९ मार्चला होत आहे. मात्र या हुडोत्सवाला खऱ्या अर्थाने आज दुपारपासुन प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात पंढरपूर नंतर कुणकेरी गावातच हुडोत्सव होत असुन १०० फुटी हुड्यावर चढणाऱ्या संचारीत अवसरांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.या उत्सवानिमित्त मंगळवारी दुपारी वाजता गाव रोंबाट सुटले. त्यांनतर सायंकाळी ६ वाजता हुड्याजवळ सामुदायिक नारळ फोडण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता घुमटवादनासह हुडा आणि होळीवर धुळ मारण्यात येणार आहे. रात्री १० वाजता गाव रोंबाट आणि रात्री ११ वाजता हुडा आणि होळीवर पेटत्या शेणी फेकुन ढोल ताश्यासह भाभीचे रोंबाट आणून नंतर कवळे व पेटत्या मशाली घेउन हुडा आणि होळी भोवती फिरण्याचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार हुडोत्सवाचा मुख्य दिवस असुन या दिवशी सकाळ पासून भावई देवीच्या निवासस्थानी देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता मांडावरून गाव रोंबाट सुटणार असून याचवेळी पळसदळा येथे
आंबेगावच्या श्री देव क्षेत्रपाल निशाणाची भेट होणार आहे. त्यानंतर कोलगाव सिमेवर कलेश्वर देवस्थानची निशाण भेट होऊन सर्वजण भावई मंदिरकडे येणार आहे. सायंकाळी ४:३० वाजता हुड्याजवळ घोडेमोडणी व लूटूपुटूचा खेळ होणार असून सायंकाळी ६ वाजता हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने हुडोत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी हुडोत्सवाचा आणि श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी, गावपंच आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.