ओटीटीवर परतणार ‘द फॅमिली मॅन’
क्रिएटर्स राज अँड डीकेची वेबसीरिज द पॅमिली मॅनला ओटीटीच्या जगतातील सर्वात लोकप्रिय वेबसीरिज म्हणून ओळखले जाते. अभिनेता मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजवरून चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. आता निर्मात्यांनी याच्या तिसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 2019 मध्ये द फॅमिली मॅन ही वेबसीरिज प्रदर्शित करण्यात आली होती. पहिला सीझन सुपरहिट राहिला आणि याच्या आधारावर 2021 मध्ये या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित करण्यात आला. आता 4 वर्षांनी ‘द फॅमिली मॅन’चा तिसरा सीझन येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओकडून द फॅमिली मॅन 3 चा एक टीझर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. याचा तिसरा सीझन 21 नोव्हेंबरपासून स्ट्रीम करण्यात येणार आहे. नव्या सीझनमध्ये काही नवे चेहरे दिसून येणार आहेत. मनोज वाजपेयी, प्रियामणि आणि शरीब हाशमीसोबत यावेळी जयदीप अहलावत आणि निमरत कौरची एंट्री झाली आहे.