For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन दिवसांच्या घसरणीला अखेर विराम!

06:39 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन दिवसांच्या घसरणीला अखेर विराम
Advertisement

सेन्सेक्स 150 अंकांनी वधारला : आयटीच्या समभागांमध्ये चमक

Advertisement

मुंबई :

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील मागील दोन दिवसांच्या सत्रात सोमवार व मंगळवारी घसरणीचा कल राहिला होता. मात्र बुधवारी भारतीय बाजारात पुन्हा तेजीचा प्रवास परतल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने आयटी क्षेत्रातील समभागांच्या तेजीचा बाजाराला लाभ झाल्याचे दिसून आले.

Advertisement

मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 149.85 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.19 टक्क्यांसोबत 79,105.88 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 4.75 अंकांच्या हलक्याशा तेजीसह निर्देशांक 0.02 टक्क्यांसोबत वधारुन 24,143.75 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बुधवारी सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 समभाग हे वधारले आहेत. यामध्ये टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, महिंदा आणि महिंद्रा यांचे समभाग पहिल्या पाच मध्ये मजबूत राहिले आहेत. यासह भारती एअरटेल, टाटा मोटर्स, स्टेट बँक, टायटन, आयटीसी, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, सनफार्मा आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग हे नफा कमाईसह बंद झाले आहेत.

अन्य कंपन्यांच्या कामगिरीत सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 15 समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. यात अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, अदानी पोर्टस आणि पॉवरग्रिड कॉर्प या कंपन्यांचे समभाग मोठ्या घसरणीत राहिल्या आहेत.

दरम्यान इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, कोटक बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्स यांचेही समभाग नुकसानीत राहिले आहेत.

जागतिक स्थितीचा प्रभाव

जागतिक पातळीवरील विविध घडामोडींमध्ये बुधवारी आशियातील बाजारात सियोल आणि टोकीओ हे उच्चांकी पातळी प्राप्त करुन बंद झाले आहेत. शांघाय आणि हाँगकाँग हे खालच्या पातळीवर राहिले आहेत. युरोपीयन बाजार वधारुन बंद झाला आहे.

Advertisement
Tags :

.