वाफोली माऊली देवस्थानचा जत्रोत्सव १२ नोव्हेंबरला
01:20 PM Nov 11, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
प्रतिनिधी
बांदा
Advertisement
वाफोली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. केळी ठेवणे, ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री पालखी प्रदक्षिणा होणार असून मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी देवीचे दर्शन व नाट्य रसिकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस तसेच मानकरी, ग्रामस्थ व वाफोली हितवर्धक संस्था मुंबई यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement
Next Article