कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इन्सुलीच्या माऊली चरणी हजारो भाविक नतमस्तक

02:35 PM Dec 07, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

जत्रोत्सव मोठ्या उत्साहात

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

इन्सुली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी देवीची ख्याती आहे. वार्षिक उत्सवात देवीच्या दर्शनासह तीची ओटी भरण्यासाठी यावर्षी हजारो भाविक नतमस्तक झालेत. दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री देवी माऊली दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रात्री होणारी गर्दी पाहता देवस्थान समितीच्या विनंतीनुसार बांदा पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सहकार्य केले. जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या माऊलीच्या दर्शनासाठी विविध भागातून भाविक हजेरी लावतात.सकाळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर मंदिरात पुजा , अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी श्री देवी माऊलीला व त्यांच्या तरंगांना भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकार व आकर्षक फुलांनी सजवण्यात आले. त्यानंतर देवस्थानचे मानकरी यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरुन गावात सुख, समाधान, शांती नांदण्यासह ग्रामस्थांसह भक्तांच्या समृद्धता व आरोग्यदायी जीवनासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर श्रींच्या दर्शनासह देवीची ओटी भरण्यास दर्शनास प्रारंभ झाला.दरम्यान सकाळी देवघराकडून तरंग काठी व पालखी सवाद्य मंदिरात आगमन झाले. देवीच्या दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविक उपस्थित होते. देवीच्या कृपाआशीर्वादासह तिची ओटी भरणे. नवस बोलणे, फेडणे ,केळी , नारळ ठेवणे आदी कार्यक्रम संपन्न झाले . या उत्सवात वर्षातून एकदाच होणारया देवतांच्या वैशिष्ट्यपूर्ण व आगळ्या वेगळ्या साज शृंगारातील 'याची देही याची डोळा, तेजस्वी दर्शनाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या उत्सवा निमित्त मंदिरात सुजय कोठावळे, यश गावकर,मयुर गावडे व सहकाऱ्यांनी फुलांनी आकर्षक सजावट केली होती . तर सिद्धिविनायक डेकोरेट्सचे अरविंद कोटणीस यांनी मंदिराला आकर्षक विधुत रोषणाई केली होती . जत्रोत्सवासाठी भाविकांची दरवर्षीप्रमाणे होणारी गर्दी लक्षात घेऊन पार्श्वभुमिवर देवस्थान कमिटी मानकरी आणि ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन केल्याने भाविकांची गैरसोय न होता त्याना देवतांचे दर्शन झाले. यावेळी दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी पाहता बांदा पोलिसांचे पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी सहा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी मोलाचे सहकार्य केले.मध्यरात्री सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली तर उशिरा नाट्य प्रयोगाने जत्रोत्सवाची सांगता करण्यात आली.दरम्यान श्री देवी माऊली दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.माऊली मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात माजी बांधकाम सभापती बाळा गावडे व एडवोकेट कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष मनोहर गावकर, सरपंच तात्या वेंगुर्लेकर, विद्या विकास मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप कोठावळे, देवस्थान समिती खजिनदार अशोक सावंत, सचिव दिलीप पेडणेकर,माजी उपसरपंच कृष्णा सावंत, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, देवस्थान समिती सदस्य तथा विद्या विकास मंडळ संचालक अजय कोठावळे, विद्या विकास मंडळ संचालक सचिन दळवी, माजी मुख्याध्यापक विनोद गावकर,गजेंद्र कोठावळे, नामदेव पालव, विद्या विकास मंडळाचे संचालक विकास केरकर, माजी सरपंच बाळू मेस्त्री, नंदू पालव, माजी सोसायटी चेअरमन आनंद राणे, सुभाष गावकर, प्रभाकर परब, भाई नाटेकर, शंकर मेस्त्री, संदीप गावडे, तातो परब , प्रकाश धुरी, समीर गावडे दाजी जाधव, बाबा मसुरकर, सुभाष बांदिवडेकर, राजाराम राणे, प्रताप सावंत, गजानन गांवकर,रघुवीर देऊलकर, सुनील रेडकर, औदुंबर परब, उल्लास गावडे, बाळा कोठावळे, अशोक सावंत, विजय गावकर, आजो परब, आबा परब, रुपेश परब, श्रीधर गावकर, अमोल शिरोडकर, प्रकाश धुरी, महेश धुरी, भाऊ गावकर, विजय परीट, विजय आकेरकर, संदीप गावकर, राजन गावकर, दादा राऊळ, बबन राऊळ, अरुण परब, आदिसह ग्रामस्थ, मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळा गावडे म्हणाले, प्रत्येक गावात धार्मिक उत्सव होत असतात ते आम्ही बघत असतो मात्र आपल्या इन्सुली गावात धार्मिक कार्यक्रमात होणारी एकजूट वाखाणण्याजोगी आहे. येथील युवा पिढीने हा वसा कायम चालू ठेवणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्षे ग्रामस्थांच्या वतीने दिनदर्शिकेचे नियोजन केले जाते यात सगळे ग्रामस्थ एकजुटीने काम करत असतात ते कौतुकास्पद आहे. मंदिराचे काम आता अंतिम टप्यात असून ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याने पूर्ण झाले.यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष मनोहर गावकर म्हणाले, कोणतेही काम करत असताना एकजुट महत्वाची असते ती एकजुट आपल्या गावात आहे.आपल्या गावातील प्रत्येकाच्या सहकार्यामुळे येथे कार्यक्रम करणे सहज शक्य होते. प्रत्येक कार्यक्रमात सर्वजण झोकून काम करतात यात ग्रामस्थ, मानकरी, देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी यांचे मोठे सहकार्य असते. त्यामुळे मी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.यावेळी ज्यांनी ज्यांनी मंदिर कामासाठी सहकार्य केले त्यांचे देवस्थान समिती तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पालव यांनी , प्रास्ताविक विनोद गावकर तर आभार विकास केरकर यांनी मानले.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article