For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानला महागात पडली गटबाजी

06:08 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानला महागात पडली गटबाजी
Advertisement

संघासोबत क्रिकेट मंडळातही मोठे बदल होण्याचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ कराची

टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानला लवकर बाहेर पडण्याचा जो धक्का बसला त्याचा ठपका संघातील गटबाजी आणि महत्त्वाच्या क्षणी वरिष्ठ खेळाडूंकडून खराब प्रदर्शन घडणे यावर  ठेवला जात आहे. यामुळे केवळ संघातच नव्हे, तर पाकिस्तान क्रिकेट मंडळामध्ये देखील मुख्य बदल होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत.

Advertisement

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबर आझमसमोर कर्णधारपदी पुनरागमन करताना सर्वांत मोठे आव्हान हे संघाला एकत्र आणण्याचे होते. परंतु गटबाजीमुळे तो तसे करू शकला नाही. शाहीन शाह आफ्रिदी कर्णधारपद गमावल्यामुळे आणि बाबरने आवश्यक त्या वेळी त्याला साथ न दिल्याने नाराज झाला, तर मोहम्मद रिझवान कर्णधारपदासाठी त्याचा विचार न केल्यामुळे नाराज होता.

संघात तीन गट आहेत, एकाचे नेतृत्व बाबर आझम, तर दुसऱ्याचे नेतृत्व शाहीन शाहीन आफ्रिदी करतो आणि तिसरा गट मोहम्मद रिझवानचा आहे. यातच मोहम्मद आमिर आणि इमाद वसीमसारख्या वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाले आणि विश्वचषकात अत्यंत खराब कामगिरीसाठी पाया तयार झाला, असे संघाच्या जवळच्या सूत्राने सांगितले.

इमाद आणि आमिरच्या पुनरागमनाने गोंधळात आणखीनच भर पडली. बाबरला या दोघांकडून कोणतीही सार्थ कामगिरी करून घेणे कठीण बनले. कारण त्यांनी बऱ्याच काळापासून फ्रँचायझी लीग वगळता देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरवर उच्चस्तरीय क्रिकेट खेळले नव्हते, याकडे सदर सूत्राने लक्ष वेधले. काही खेळाडू एकमेकांशी बोलतही नव्हते आणि त्यापैकी काहींनी तर संघातील सर्व गटांच्या नेत्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशीही माहिती त्याने दिली.

Advertisement
Tags :

.