For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तहसीलदार कार्यालयातून कागदपत्रे मिळण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी

11:09 AM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
तहसीलदार कार्यालयातून कागदपत्रे मिळण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी
Advertisement

तहसीलदारांना निवेदन

Advertisement

खानापूर : खानापूर येथील तहसीलदार कार्यालयातून जुनी तसेच शासकीय कामासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे तसेच शेती आणि इतर जुनी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांना तहसीलदार कार्यालयातून कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने सायबर कॅफेमधून कागदपत्रे घेण्यासाठी नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यासाठी तहसीलदारांनी तातडीने लक्ष घालून कागदपत्रे तहसीलदार कार्यालयातून उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांची भेट घेऊन दिले. यावेळी यशवंत बिरजे, दशरथ बनोशी, जोतिबा भेंडिगेरी, जयवंत निडगलकर, बसवंत बडगेर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. महसूल विभागाने तहसीलदार कार्यालयातून जुनी आणि नवी दोन्ही कागदपत्रे तहसीलदार कार्यालयातून नागरिकांना उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे.

मात्र खानापूर तहसीलदार कार्यालयातून आवश्यक असलेली कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. तहसीलदार कार्यालयातील कादपत्रे देण्यात येणाऱ्या विभागाकडून नागरिकांना सायबर कॅफेतून कागदपत्रे घेण्याचा सल्ला देण्यात येतो. तहसीलदार कार्यालयातून अंत्यत अल्पदरात कागदपत्रे उपलब्ध होतात. मात्र सायबर कॅफेतून कागदपत्रे मिळविण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक लूट सायबर कॅफेतून होत आहे. यासाठी तहसीलदार कार्यालयातून कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, यासाठी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी संबंधित विभागाला योग्य सूचना देवून नागरिकांना कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी सोय करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण कागदपत्रे तहसीलदार कार्यालयातून उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करू, असे आश्वासन दिले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.