महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

स्ट्राँगरूमवर जिल्हास्तरीय चार अधिकाऱ्यांची नजर

11:13 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अधिकाऱ्यांकडून 24 तास पाहणी, निवडणूक विभागाकडे दैनंदिन अहवाल सादर

Advertisement

बेळगाव : बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघांसाठी दि. 7 मे रोजी मतदान घेण्यात आले असून मतदान यंत्रे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. चार जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून 24 तासांत चारवेळा स्ट्राँगरूमला भेट देऊन पाहणी केली जात आहे. यासंदर्भातील दैनंदिन अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला जातो. त्यामुळे मतदान यंत्रे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवली असून तीन टप्प्यात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. लोकसभा निवडणुकांसाठी अनेक राज्यांमध्ये अद्यापही मतदान सुरू असून पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघांसाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान घेण्यात आले असून सदर मतदान यंत्रे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. दि. 7 मे रोजी मतदान झाले असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आरपीडी महाविद्यालयातील स्ट्राँगरूममध्ये मतदान यंत्रे कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. स्ट्राँगरूमच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफ, सीआरपीएफ व जिल्हा पोलिसांचे सुरक्षा कवच आहे. याबरोबरच 74 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली आहे. येथील सुरक्षा व्यवस्थेची 24 तास पाहणी करण्यासाठी मॉनिटरिंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. या रूममध्ये 24 तास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तीन टप्प्यामध्ये सदर अधिकारी या ठिकाणी नियुक्त केले जातात.

Advertisement

वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिवसांतून चारवेळा स्ट्राँगरूमला भेट

या सर्व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्याबरोबरच स्ट्राँगरूमचा दैनंदिन अहवाल देण्यासाठी चार जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर अधिकारी दिवसांतून चारवेळा स्ट्राँगरूमला भेट देऊन वेळोवेळी माहिती घेऊन ती माहिती वरिष्ठांना पाठविली जाते. अशाप्रकारे निवडणूक विभाग अत्यंत काटेकोरपणे स्ट्राँगरूमवर नजर ठेवून आहे, अशी माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article