Shiv Jayanti | कोल्हापुरात शिवजन्मोत्सवाचा उत्साह; विविध कार्यक्रमांनी अवघी करवीरनगरी शिवमय!
कोल्हापुरात पारंपरिक शिवजयंतीचा जल्लोष
कोल्हापूर - कोल्हापुरात पारंपरीक शिवजयंती रविवारी विविध संस्था, संघटनांच्यावतीने साजरी होणार आहे. काही ठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमांना सुरुवातही झाली आहे.राजारामपुरीत शिवप्रतिमेची मिरवणूक निघाली आहे. मंगळवार पेठेत शिवजयंतीचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. काल गुरुवारी जुना बुधवार पेठेत संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवप्रतिमेची समारंभपूर्वक प्रतिष्ठापना करण्यात आली. संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या शिवजयंतीला शुक्रवारपासून प्रारंभहोत आहे.
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्यावतीने गुरुवारी सायंकाळी तोररकर चौकात शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली. रात्री शिवप्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे आणि उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त उपस्थित होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ७ वाजता शिवानी पूल परिसरात स्वच्छता मोहीम राबवती जाणार आहे. सायंकाळी सलाम महाराष्ट्र हा कार्यक्रम होणार आहे.
क्रशर चौकात आजपासून शिवजयंतीला प्रारंभ
संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समिती रामानगरी रोडच्यावतीने शुक्रवारी, १७ रोजी इराणी खण येचील क्रतर चौकात शिवजयंतीउत्सवाला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ५ वाजता नवीन वाशी नाका येथून मोटारसायकल रॅलीने शिवप्रतिमेची या आगमन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शनिवारी १८ रोजी सायंकाळी ६ वाजता गोव्याचे समानकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांचे शिवाजी महाराज आणि गोवा या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच मनपा पदाभिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी १० वाजता शिवजन्मकाळ सोहळा आणि सायंकाळी शिवपुत्र संभाजीराजे हे महानाट्य सादर केले जाणार आहे, यावेळी खासदार शाहू छत्रपती, पालकमंत्री प्रकाशआबिटकर, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेशक्षीरसागर, सत्यजित कदम, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे आणिगटनेते शारंगबर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती भगवान पाटील माजगायकर यांनी दिली.
रविवारी चित्रदुर्ग मठात सोहळा
वीरशैव समाजाच्यावतीने रविवारी शिवजयंती आणि महात्मा बसवेश्वर जयंती अता सयुंक्त जन्मोत्सव सोहळा सकाळी ९ वाजता दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात साजरा केला जाणार आहे. सकाळी तरूण, तरुणींची बाईक रॅली, त्यानंतर अक्कमहादेवी वीरशैव महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११ वाजता डॉ. विश्वास सुतार पांच महात्मा बसवेश्वरांचे कार्य पावर व्याख्यान होणार आहे. दुपारी १२ वाजता महात्मा बसवेश्वरांचा जन्मकाळ सोहका होणार आहे, सायंकाळी ५ वाजता चित्रदुर्ग मठातून छत्रपती शिवराय आणि महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमांच्या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. रात्री ८ वाजता अक्कमहादेवी मंडपात महाप्रसाद होणार असल्याची माहिती किरण गवळी, सुनील गाताडे यांनी दिली..