For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संपूर्ण ‘आयपीएल’ भारतातच होणार : जय शाह

06:13 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
संपूर्ण ‘आयपीएल’ भारतातच होणार   जय शाह
Advertisement

निवडणुकांमुळे स्पर्धा ‘यूएई’मध्ये हलविली जाण्याची अटकळ फेटाळली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 19 एप्रिल ते 1 जूनदरम्यान होणाऱ्या देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे इंडियन प्रीमियर लीग संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवली जाईल ही अटकळ शनिवारी फेटाळून लावली. सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएल अमिरातीमध्ये हलवली जाणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. खेळाडूंना त्यांचे पासपोर्ट संबंधित संघाकडे जमा करण्यास सांगितले जात असल्याचेही सोशल मीडियावर झळकले होते.

Advertisement

मात्र, शहा यांनी सरळ ते फेटाळून लावले आहे. संपूर्ण आयपीएल भारतात होणार आहे. आम्ही उर्वरित वेळापत्रक लवकरच तयार करू आणि ते जाहीर करू, असे शहा यांनी सांगितले आहे. आयपीएलचे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले असून गतविजेतह चेन्नई सुपर किंग्ज विऊद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर या सामन्याने 22 मार्च रोजी स्पर्धेला सुऊवात होणार आहे

बीसीसीआय सचिव शाह यांनी यापूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की, संपूर्ण स्पर्धा भारतात आयोजित केली जाईल, जशी यापूर्वी मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी 2019 मध्ये घेण्यात आली होती. ते फक्त निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची वाट पाहत होते, असे त्यांनी सांगितले. त्यापूर्वी शनिवारी सकाळी आयपीएलचे अध्यक्ष अऊण धुमल यांनीही आयपीएल देशाबाहेर हलवण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले होते आणि यूएईमध्ये स्पर्धा होणार असल्यासंबंधीची सर्व वृत्ते निराधार आहेत, असे स्पष्ट केले होते.

Advertisement
Tags :

.