कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मांजराची पूर्ण शहरच घेते काळजी

06:39 AM Apr 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोशल मीडियावर आहे मोठी स्टार

Advertisement

मांजराला एक चतुर प्राणी म्हणून ओळखले जाते. एक मांजर यूकेमध्ये स्वत:च्या अनोख्या सवयीसाठी प्रसिद्ध ठरले आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असून तिला टिकटॉकवर प्रचंड पसंत केले जात आणि त्याचे एक फेसबुक पेज देखील आहे. या अनोख्या मांजराला स्वत:च पब्स, युनिव्हर्सिटीत जाताना पाहिले जाते, तसेच ते वेप्स देखील मिळविताना दिसून येते. यूकेच्या प्लेमाउथ शहरातील या मांजराचे नाव मिसचीफ आहे. शहराचे लोक याचे व्हिडिओ तयार करत असतात आणि फेसबुक पेजवर ते शेअर करतात. मिसचीफच्या ट्रॅकिंगची माहिती पेजवर मिळत राहते. तिच्या हालचालींची खबर लोकांना फेसबुकद्वारे मिळत असते.

Advertisement

मिसचीफ युनिव्हर्सिटीच्या वर्गांमध्ये जाऊन बसण्यासाठी ओळखली जाते. तसेच ते मांजर शॉपिंग सेंटरमध्ये फिरत असते. एकदा या मांजराला स्लिमिंग वर्ल्ड मीटिंगमध्ये देखील पाहिले गेले. युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट युनियनच्या इमारतीही ही मांजर शिरते. मिसचीफ अनेकदा आमच्या घराच्या आसपास दिसते, तरीही ती दूरपर्यंत कशी हिंडून येते याचे आम्हाला आश्चर्य असल्याचे सोशल मीडिया आर्टिस्ट एमी यांचे सांगणे आहे. मिसचीफची सर्वात चर्चेत राहिलेली छायाचित्रे वेप स्टोअरची असून तेथे ती ई सिगारेट मिळवताना दिसून येते. याचबरोबर ती पबमध्ये फिरणे तसेच लोकांच्या खेळात सामील होत असते.

कधीकधी लोकांना मिसचीफच्या खोडकरपणामुळे त्रासही होतो. परंतु लोक तिच्या बचावासाठी पुढे येत असतात. कधीकधी मिसचीफमुळे काही गोष्टी तुटत असतात. तरीही लोक तिला एक शिस्तप्रिय मांजर मानतात. अनेकदा हे मांजर स्वत:च वेट डॉक्टरकडे जात असते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article