महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जनतेमधील उत्साह हाच भाजप विजयाचा पुरावा!

12:07 PM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचा विश्वास : दोन्ही मतदारसंघांत भाजपला जोरदार पाठिंबा

Advertisement

पणजी : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्ष आणि अपक्ष आमदार यांच्या मंगळवारी झालेल्या संयुक्त बैठकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला, अशी माहिती देऊन जनतेमध्ये भाजपला मतदान करण्याचा उत्साह असून तोच उत्साह भाजपच्या विजयाचा पुरावा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले. मंगळवारी पणजीत आयोजित एनडीए घटकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत राज्यस्तरीय प्रचारासंदर्भात विचारविनियम करण्यात आला. विविध मतदारसंघांबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत सर्वांनी मिळून भाजप उमेदवारांना विजयी करण्याच्या दृष्टीने सर्व शक्ती पणाला लावून काम करण्याचा निर्धार करण्यात आला. एनडीएच्या दिल्लीत होणाऱ्या प्रत्येक बैठकीला मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर उपस्थित राहत असतात. आतापर्यंतच्या प्रचाराचा आढावा घेतल्यास प्रचार योग्य दिशेने चालला असल्याचा दावा तानावडे यांनी केला. प्रत्येक मतदारसंघात भाजपला मतदारांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच दक्षिण गोव्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळीही अफाट जनसमुदाय उपस्थित होता. लोकांचा हा उत्साह पाहता भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, यात दुमत नाही, असे तानावडे यांनी सांगितले.

Advertisement

गृहमंत्री अमित शहांची 3 मे रोजी म्हापसा येथे सभा

दक्षिण गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. पल्लवी धेंपे या भाजपच्या उमेदवार 40 हजार मताधिक्क्याने विजयी होतील.  त्यासाठी जाहीर सभेला उपस्थित तमाम जनतेचे आभार मानतो. येत्या दि. 3 मे रोजी गृहमंत्री अमित शहा यांची म्हापसा येथे जाहीर सभा होणार आहे. दि. 2 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता फोंडा येथे जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती तानावडे यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article