महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लिश संघ पाक दौऱ्यावर, तीन कसोटी खेळणार

06:04 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

17 सदस्यीय संघाची घोषणा : बेन स्टोक्सचे पुनरागमन

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

इंग्लंड संघ पुढील महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. महत्वपूर्ण मालिकेसाठी बुधवारी ईसीबीने 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन करणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी खूप महत्त्वाची असेल,  गुणतालिकेत इंग्लंड सहाव्या आणि पाकिस्तान आठव्या स्थानावर आहेत. उभय संघातील पहिली कसोटी दि. 7 ऑक्टोबरपासून मुलतान येथे खेळवली जाणार आहे.

इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. त्याच्या अनुपस्थितीत ओली पोपने इंग्लंडची धुरा सांभाळली होती. स्टोक्स आता दुखापतीतून सावरला असून पाकिस्तानविरुद्ध मालिकेतून तो आता पुनरागमन करणार आहे. बोटाच्या दुखापतीमुळे जवळपास सात महिने संघाबाहेर असलेला जॅक लीचही या मालिकेत खेळणार आहे. पाकिस्तानी खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजी खूप महत्त्वाची ठरेल, यामुळेच शोएब बशीरसह इंग्लंडने रेहान अहमद आणि जॅक लीचचाही संघात समावेश केला आहे. फिरकीपटू टॉम हार्टलीला मात्र संघात स्थान मिळवता आलेले नाही. 20 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज जोश हलने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या  कसोटी सामन्यात इंग्लंडकडून पदार्पण केले. त्याला पाक दौऱ्यावर जाण्याची संधीही मिळणार आहे. ब्रायडन कारसे आणि जॉर्डन कॉक्स या दोन अनकॅप्ड खेळाडूंची कसोटी संघात वर्णी लागली आहे. अनुभवी जो रुट, ओली पोप, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी स्मिथ यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. दुसरीकडे, मार्क वूड मात्र दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नाही.

इंग्लंड कसोटी संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, जोश हल, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रुट, जेमी स्मिथ, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, रेहान अहमद, गस अॅटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्से, जॉर्डन कॉक्स.

 

इंग्लंड व पाकिस्तान कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  1. पहिला कसोटी सामना, (7 ते 11 ऑक्टोबर), मुलतान
  2. दुसरा कसोटी सामना, (15 ते 19 ऑक्टोबर), कराची
  3. तिसरा कसोटी सामना, (24 ते 28 ऑक्टोबर), रावळपिंडी
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article