महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘नवा सोमवार’ उत्सवाची सांगता

12:46 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन्ही पालख्या आपापल्या आधिस्थानात दाखल, गायनाच्या मैफली रंगल्या. पहाटेपर्यंत लोकांची गर्दी

Advertisement

डिचोली : डिचोलीची ग्रामदेवी श्री देवी शांतादुर्गेच्या प्रसिद्ध ‘नवा सोमवार’ उत्सवाची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली. काल मंगळवार दि. 19 रोजी दोन्ही पालख्या आपापल्या आधिस्थानात पूर्ववत दाखल झाल्यानंतर उत्सवाची सांगता झाली. दोन्ही ठिकाणी झालेल्या चार संगीत मैफलींनी रसिक स्रोते मंत्रमुग्ध झाले. पहाटेपर्यंत डिचोली शहरात या उत्सवासाठी भाविकांची गर्दीच होती. दोन वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने साजरा झालेल्या या उत्सवात लोकांनी चांगलाच सहभाग दाखविला. गावकरवाडा डिचोली येथील मंदिरातून रात्री 10 वा. बाहेर पडलेल्या पालखीने भाविकांना भेटी देत पहाटे पालखीचे मंदिरात पूर्ववत आगमन झाले. मंदिराच्या प्रांगणात पहिली संगीत मैफल रंगली. समृध्द चोडणकर प्रस्तुत ठओंकार अनादी अनंतठ या भाव, भक्ती, नाट्यागीतांच्या कार्यक्रमात प्रसिध्द कलाकार विश्वजीत बोरवणकर (मुंबई), अस्मिता धापटे या कलाकारांकडून गायन सादर केले. या कार्यक्रमाचे निवेदन संगीता जोशी यांनी केले.

Advertisement

या उत्सवाची दुसरी संगीत बैठक रात्री श्री रवळनाथ मंदिर प्रांगणात झाली. ठसुर गंगा मंगलाठ या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक कैलास खरे (मुंबई), प्राजक्ता काकतकर यांनी गायन सादर केले. तर अमेय रानडे निवेदन केले. रात्री 8 वा. श्री देवी शांतदुर्गेची पालखी मठमंदिरातून सजवून बाहेर काढली व श्री लक्ष्मीनारायण मंदिराजवळ ठेवली. तेथे भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री 10 वा. च्या सुमारास बँड पथकासह पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. पालखी आतीलपेठ, सोनारपेठ, भायलीपेठ व बोर्डे वडाकडे पर्यंत जाऊन माघारी फिरून भायलीपेठ, सुंदरपेठ मार्गे आतीलपेठ येथील मठमंदिरात आज मंगळवारी दुपारी विधीवतपणे दाखल झाली.

या उत्सवातील पहिली बैठक रात्री 10 वा. आतीलपेठ मठमंदिरात झाली. प्रसिध्द गायक भाग्येश मराठे (मुंबई), व गायिका श्रुती मराठे (मुंबई) यांचे गायन सादर केले. त्यांना प्रणव गुरव, वरद सोहनी संगीत साथ करतील. दुसरी बैठक गुरूफंड ट्रस्ट भायलीपेठ येथे झाली. स्थानिक कलाकार अन्सिका नाईक, गणेश मेस्त्री (सारेगामा फेम) यांनी गायन सादर केले. त्यांना चांगदेव नाईक, ओमप्रकाश गावस, विराज गावस, सुरेश घाडी यांनी संगीतसाथ केली. तर या कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन संजय सालेलकर यांनी केले. या उत्सवानंतर आता दर सोमवारी देवीची पालखी गावकरवाडा येथील मंदिरातून व आतीलपेठ येथील मठमंदिरातून भाविकांच्या भेटीसाठी निघेल. भाविकांकडून ओटी व सेवा रूजू करून घेतल्यानंतर पालखी आपापल्या आधिस्थानात परतणार. नव्या सोमवार डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्या? हे आपल्या कार्यकर्त्यांसह, दीचोलीचे मामलेदार राजाराम परब यांनीही सहभाग घेवून प्रथम गावकर वाडा व आतील पेठ येथील शांतादुर्गा देवीचे दर्शन घेतले. व त्यांनी पालखीत सहभाग घेवून  श्री शांतादुर्गा माता की जय असा जयघोष करीत पालखीबरोबर आतील पेठ, सोनार पेठ या पर्यंत ते गेले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article