महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवडणूक आयोग जाणार जम्मू काश्मीर दौऱ्यावर

06:48 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

येत्या आठवड्यात घेणार परिस्थितीचा आढावा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग लवकरच 8 ते 10 ऑगस्टदरम्यान जम्मू काश्मीरला भेट देऊ शकतो. राज्यातील प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणुकीच्या रणधुमाळीचे नियोजन अंतिम करण्याची तयारी अधिकाऱ्यांनी चालवली आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर प्रशासनाला तीन वर्षांपासून त्याच ठिकाणी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांच्या गृहजिह्यांमध्ये बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडच्या मुख्य सचिवांनाही अशाच सूचना दिल्या असून तेथेही या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत.

यावषी जूनमध्ये निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील मतदार यादी अद्ययावत करण्याचे आदेश जारी केले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी 20 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. डिसेंबर 2023 मध्ये जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाशी संबंधित कलम 370 वरील याचिकेवर सुनावणी करताना 30 सप्टेंबरपर्यंत केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच, जम्मू काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article