For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंड्यांची होणार प्रयोगशाळेत तपासणी

10:46 AM Dec 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
अंड्यांची होणार प्रयोगशाळेत तपासणी
Advertisement

बेंगळूर : अंड्यांमध्ये कर्करोगाला कारणीभूत ठरणारे घटक आढळून आल्याचे खोटे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे अंड्यांचे नमुने गाळा करून चाचणीसाठी पाठवून दिले आहेत. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर योग्य कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने दिले आहेत. अंड्यांमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक आढळल्याच्या अफवा काही ठिकाणी सोशल मीडियावर पसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील अंड्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाचण्यांमध्ये अंड्यांत कर्करोग निर्माण करणारे घटक आढळल्यास अंडी उत्पादकांवर कठोर कारवाई केली जाईल. मागील चाचण्यांमध्ये अशा कोणत्याही प्रकारचे हानीकारक घटक आढळले नव्हते, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.