For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तोपर्यंत एकही निवडणूक महायुतीने लढवणार नाही - संजू परब

02:37 PM Aug 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
तोपर्यंत एकही निवडणूक महायुतीने लढवणार नाही   संजू परब
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध आज सावंतवाडीत भाजपच्या वतीने करण्यात आला. शिवसेना नेते रामदास कदम यांचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी जोपर्यंत रामदास कदम मंत्री रवींद्र चव्हाण यांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीत कोठेही सहकार्य करणार नाही किंवा एकही निवडणूक यापुढे महायुतीने लढवली जाणार नाही असा निर्धार केला. तर युवा नेते संदीप गावडे यांनी जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाही तोपर्यंत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांना आम्ही सहकार्य करणार नाही असे हे स्पष्ट केले. यावेळी महिला शहर संघटक मोहिनी मडगावकर, मकरंद तोरस्कर.,सुधीर आडीवरेकर., गुरु सावंत, ज्ञानेश्वर सावंत ,दीनानाथ नाईक ,साक्षी गवस, सौ . साळगावकर. श्री गुरु साठेलकर ,परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.