अर्थव्यवस्था 6.8 टक्के विकसित होणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत असून यावर्षी 6.8 टक्के इतक्या दराने विकसित होणार असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पूनम गुप्ता यांनी वर्तवला आहे. सध्याला 6.5 टक्के इतका विकासदर असून 6.8 टक्केचा अंदाज हे भारताचे उद्दिष्ट नसून आगामी काळात विकासाची मोठी संधी असेल.
विविध गोष्टींची साथ
डेप्युटी गव्हर्नर पुनम गुप्ता म्हणाल्या, विकासाचे ध्येय गाठायचे असेल तर पतधोरणाअंतर्गत व्याजदर योग्य ते राखण्याची गरज असून आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकार आवश्यक ते सहाय्य करत आहे. उत्तम कर प्रणाली, पायाभूत सुविधांवर होणारा अधिकचा खर्च त्याचप्रमाणे पारदर्शक प्रक्रिया यामुळे विकासाला गती मिळताना दिसते आहे. महामारीचा काळ वगळता त्यानंतरच्या काळात भारताने आपला अधिकचा वेळ हा खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठीच केलेला दिसून आला.
खर्च करण्याचे प्रयोजन सुरुच
डेप्dयुटी गव्हर्नर म्हणाल्या की, सरकारने आवश्यक त्या विकास कामांसाठी जास्तीचा खर्चही करण्याचे नियोजन केलेले आहे. तेच आज भारताच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक ठरलेले दिसते आहे. सध्याला पाहता महागाईचा स्तर खूपच कमी झाला आहे. खाद्य पदार्थांच्या किमती कमी झाल्या आहेत. सोन्याचांदीच्या वाढत्या दराचा महागाईवर काहीसा परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.