महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बदके करतात कारागृहाची देखरेख

06:49 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोणत्याही कारागृहाच्या संरक्षणासाठी आणि देखरेखीसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येते, ही नित्यपरिचयाची बाब आहे. कारागृहात धोकादायक कैद्यांचे वास्तव्य असल्याने त्यांना सुरक्षेची अत्याधिक आवश्यकता असते. कारागृहातील कैदी पळून जाण्याचा प्रयत्न वारंवार करतात. म्हणून सुरक्षा व्यवस्थाही कडोकोट ठेवावी लागते. हे काम प्रशिक्षित माणशांशिवाय अन्य कोणी करु शकत नाहीत, अशी आपली समजूत असते. पण ती काहीवेळा खोटी ठरते.

Advertisement

काहीवेळा प्रशिक्षित श्वानांचा उपयोग या कामासाठी केला जातो. पण असे कारागृह संख्येने फार कमी आहेत, की जेथे माणसांवर लक्ष ठेवण्याचे काम श्वानांवर सोपविलेले असते. तथापि, ब्राझीलच्या सेंट कॅटरिना येथील मध्यवर्ती कारागृहात सुरक्षा व्यवस्थेचे हे उत्तरदायित्व चक्क बदकांवर सोपविलेले आहे.

Advertisement

बदके हे काम श्वानांपेक्षाही सजगपणे करतात असा अनुभव आहे. जराशीही काही अनैसर्गिक हालचाल दिसली किंवा जाणवली, की, ही बदके प्रचंड गोंधळ आणि कल्ला करण्यास प्रारंभ करतात. त्यामुळे इतर सुरक्षा रक्षकांचे त्या भागाकडे लक्ष जाते. तेथे कैद्यांची काही संशयास्पद हालचाल होत असेल तर ती वेळीच रोखणे यामुळे शक्य होते. ही बदके काही अंतरावरुन कारागृहातील कैद्यांवर दृष्टी ठेवतात. त्यामुळे ती कैद्यांच्या हाती सापडत नाहीत. बदकांचीही दृष्टी सूक्ष्म असल्याने ते हे काम चोखपणे करतात असा व्यवस्थापनाचा अनुभव आहे. बदकांकडून कारागृहाचे संरक्षण करुन घेण्याचा हा प्रकार ब्राझीलमध्ये अनेक दशकांपासून होत आहे. त्याचा अनुभव चांगला असल्याने इतर अनेक कारागृहांमध्ये त्याचे प्रयोग केले जात आहेत. बदकांना सांभाळण्याचा खर्च कमी असतो. शिवाय त्यांना निवृत्तीनंतरचे लाभ द्यावे लागत नाहीत. त्यामुळे प्रशासनाचा सुरक्षेचा खर्च बऱ्याच प्रमाणात वाचतो. अशा प्रकारे बदके उपयोगी पडत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article