For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपामध्ये सोमवारी पसरला शुकशुकाट

10:59 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपामध्ये सोमवारी पसरला शुकशुकाट
Advertisement

कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाल्याने समस्या : कामासाठी आलेल्या अनेकांची गैरसोय

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. 7 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या कामासाठी महानगरपालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आल्याने नेहमी गजबजलेल्या महानगरपालिकेमध्ये सोमवारी शुकशुकाट पसरला होता. सर्वच विभाग बंद केल्याने कामासाठी आलेल्या अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागले. निवडणुकीच्या कामासाठी आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, लेखा विभाग, आश्रय योजना विभागसह इतर विभागातील कर्मचारी रवाना झाल्याने मनपामध्ये शुकशुकाट पसरला होता. जन्म आणि मृत्यू दाखला देण्याचे काम गेल्या चार दिवसांपासूनच बंद केले आहे. त्यामुळे नेहमीच गर्दी असलेल्या ठिकाणीही शुकशुकाट होता.

कार्यालयात कोणीच नसल्याने गैरसोय

Advertisement

महानगरपालिकेमध्ये कर भरणा, जन्म आणि मृत्यू दाखला नोंद करणे तसेच तो मिळविण्यासाठी आलेल्या नागरिकांचीही गैरसोय झाली. जन्म-मृत्यू दाखल्यासाठी तरी किमान एक-दोन तरी कर्मचारी सेवेत असणे गरजेचे होते. चौकशीसाठी आलेल्या नागरिकांनाही माहिती देण्यासाठी कोणीच नसल्याने त्यांनाही माघारी फिरावे लागले. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी गांधीनगर येथील नागरिक मनपा आयुक्त व अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी कोणीच नसल्याने त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची हेळसांड

सोमवारपासूनच आठवड्याला सुरूवात होते. त्यामुळे सोमवारी नेहमीच गर्दी असते. मात्र पहिल्याच दिवशी कोणी नसल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आठवड्याचा पहिल्याच दिवस वाया गेल्याचा सूर उमटला. मंगळवारी मतदान असल्याने त्या दिवशी तर सुट्टीच आहे. त्यामुळे आता बुधवारी तरी मनपाचे कामकाज सुरळीत सुरू होईल का? हा प्रश्न आहे.

Advertisement
Tags :

.