महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चालकाचा ताबा सुटून भरधाव कार उलटली! कराडच्या ओंड येथील घटना, मुंबईची महिला ठार

02:07 PM Jul 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

उंडाळे प्रतिनिधी

भरधाव चालकाचा कारचा ताबा सुटल्याने कार फरपटत शेतात जाऊन उलटल्याने भीषण अपघात झाला. कराड-उंडाळे रोडवर ओंड गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात कारमधील प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जयश्री संतोष मोरे (वय 42, रा. सानपाडा, नवी मुंबई) असे अपघातात ठार झालेल्या मा†हलेचे नाव आहे.

Advertisement

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नवी मुंबई सानपाडा येथील भोसले, मोरे, कदम व लोंढे हे कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी इर्टिगा कारमधून गुरूपौर्णिमानिमित्त नाणिज येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून पुन्हा ते नवी मुंबईकडे परतत होते. सोमवारी पहाटे ते कराड तालुक्यातील ओंड गावच्या हद्दीत सर्जेराव थोरात यांचा मालकीच्या पेट्रोल पंपाजवळ आली. यावेळी भरधाव असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याकडेच्या शेतात जाऊन उलटली. कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. जोराचा मार लागल्याने जयश्री मोरे या मा†हलेचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

या घटनेत विकास वसंत भोसले, शैलजा संजय कदम, माधुरी लोंढे व गाडी चालक गिरीष गुहागरकर हे चार जण जखमी झाले. स्थानिक नागरिकांसह इतर वाहनधारकांनी ही घटना पोलिसांना कळवत अपघातग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरती कराडच्या कृष्णा ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची तक्रार संतोष वसंत मोरे यांनी कराड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

Advertisement
Tags :
Karadchi woman killedtarun bharat newsThe driver lost
Next Article