For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम सुरूच

12:17 PM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
शहरातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम सुरूच
Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची धडक मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. सोमवारी चन्नम्मा चौकासह कोल्हापूर सर्कल येथील कॅन्टिलिव्हर आणि ग्रॅन्ट्रीजवरील अनधिकृत फलक हटविण्यात आले. सातत्याने सुरू ठेवण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनधिकृत जाहिरात फलकांचा विळखा पडलेल्या शहराने मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. पदपथावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी मनपाच्या अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी स्वीकारली आहे. त्यानुसार कारवाईला  सुरुवात झाली असून त्या पाठोपाठ अनधिकृत जाहिरात फलकदेखील हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विविध ठिकाणचे जाहिरात फलक हटविण्याची मोहीम सुरूच आहे. सोमवारी महापालिकेच्या महसूल विभागाकडून चन्नम्मा सर्कल आणि कोल्हापूर सर्कल येथील कॅन्टीलिव्हर व ग्रॅन्ट्रिजवरील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यात आले.

Advertisement

आवश्यक मनुष्यबळही नाही

उंचावरील जाहिरात फलक हटविण्यासाठी महानगरपालिकेकडे वाहन नसल्याने ते भाडोत्री घेतले जात आहेत. त्याचबरोबर उंचावरील फलक काढण्यासाठी आवश्यक मनुष्यबळही महानगरपालिकेकडे नाही त्यामुळे सदर कर्मचारीदेखील पगारी घेतला जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.