महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिरंदाजीत पहिल्या मेडलचे स्वप्न हुकले

06:29 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंकिता-धीरज जोडीला कांस्यपदकाची हुलकावणी

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

अंकिता भगत आणि धीरज यांनी तिरंदाजीच्या मिश्र दुहेरी इतिहास रचला. पण त्यांना कांस्यपदकाने हुलकावणी दिली. भारत आणि अमेरिकेचा सामना चांगला रंगला होता. पण अमेरिकेने कांस्यपदकासाठी झालेली लढत 6-2 अशी जिंकली. त्यामुळे भारताचा पराभव झाला. ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत भारत यावेळी प्रथमच पोहोचला होता. त्यामुळे त्यांची ही कामगिरी मोलाची ठरली.

अंकिताला पहिल्या सेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पहिल्या फटक्यात तिला फक्त सात गुण मिळवता आले. यामुळे भारत तिथेच पिछाडीवर पडला होता. कारण अमेरिकेने यावेळी पहिला सेट जिंकत 2-0 अशी दमदार आघाडी घेतली होती. दुसऱ्या गेममध्येही अंकिताकडून वाईट सुरुवात झाली, कारण तिला फक्त सात गुण कमावता आले. धीरजने 10 गुण पटकावले होते. पण अमेरिकेने त्यानंतर दुसरा सेटही जिंकला आणि 4-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये भारताने दमदार कमबॅक केले. अंकिता चांगल्या फॉर्मात आली. धीरजनेही तिला चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला दोन गुण मिळाले. भारत यावेळी 2-4 अशा स्थितीत होता. चौथ्या सेटमध्ये अमेरिकेची जोडी भारतावर भारी पडली व तिरंदाजीत भारताला कांस्यपदकाने हुलकावणी दिली. अमेरिकेनच्या केसी-ब्रॅडी जोडीने कांस्यपदक जिंकले

तत्पूर्वी, शुक्रवारचा दिवस अंकिता व धीरजसाठी चांगलाच धावपळीचा ठरला. यादिवशी उपउपांत्यपूर्व, उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीचा सामना भारतीय जोडीने खेळला. उपउपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला, उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या जोडीला नमवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत मात्र भारतीय जोडीला बलाढ्या दक्षिण कोरियाकडून हार पत्कारावी लागली. यानंतर भारताला कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी मिळाली. या लढतीत अमेरिकेने भारताला नमवले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article