For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळवारच्या सत्रातही घसरणीचा प्रवास कायम

06:58 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंगळवारच्या सत्रातही घसरणीचा प्रवास कायम
Advertisement

सेन्सेक्समध्ये 465 अंकांची रिकव्हरी : पश्चिम आशियातील तणावासह कच्च्या तेलाच्या किमतीचाही परिणाम

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई  निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. ही सलग दुसरी घसरण नोंदवली आहे. सेन्सेक्समध्ये जवळपास 465 अंकांची रिकव्हरी होत बाजार बंद झाला आहे. निफ्टीही यावेळी 22,750 च्या खाली राहिला होता.

त. भा. वृत्तसंस्था

Advertisement

मुंबई : प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 242.65 अंकांनी घसरुन निर्देशांक 72,529.07 वर बंद झाल आहे दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 64.05अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 22,716.20 वर बंद झाला आहे.

दरम्यान यावेळी मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक काहीशा दबावात राहिले होते. यामध्ये निफ्टी स्मॉलकॅप 0.81 टक्क्यांनी घसरणीत होता, तर निफ्टी मिडकॅप हा 0.99 टक्क्यांनी घसरुन बंद झाला आहे. विविध कंपन्यांपैकी निफ्टीमधील अदानी एंटरप्राईजेसमध्ये तेजी राहिली. यासोबतच डॉ.रे•ाrज लॅब 2.45 टक्के, सनफार्मा 1.47 टक्के आणि इन्फोसिस 1.22 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत.

यासह ज्या कंपन्या नुकसानीत राहिल्या आहेत, त्यामध्ये विप्रो 2.96 टक्पेंनी घसरला आहे, एचसीएल टेक 2.45 टक्के, अपोलो हॉस्पिटल 2.27 टक्के आणि टेक महिंद्रा 2.06 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले आहेत.

तब्बल 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान

सोमवार, 28 सप्टेंबर रोजी बाजार बंद होताना गुंतवणूकदारांचे जवळपास 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएसई शेअर बाजाराच्या अधिकृत आकडेवारीनुसार, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सुमारे 8 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. गेल्या वर्षी ते सुमारे 474 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले होते.

घसरणीची प्रमुख कारणे कोणती आहेत?

? पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम होर्मुझवर झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात समस्या निर्माण झाली आहे.

? अमेरिकन बाँड यील्ड्स ऐतिहासिक उच्चांक गाठत आहेत. यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून बाहेर पडत आहेत आणि त्यांना पुन्हा आकर्षित केले जात आहे. यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री वाढते.

? भारतीय चलन रुपया सतत कमजोरी दाखवत आहे. रुपयाने डॉलरच्या तुलनेत 96 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तो डॉलरच्या तुलनेत 96.1450 वर व्यवहार करताना दिसला.

Advertisement
Tags :

.