For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनगोळमधील मंदिराची तिसऱ्यांदा दानपेटी फोडली

10:53 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनगोळमधील मंदिराची तिसऱ्यांदा दानपेटी फोडली
Advertisement

बेळगाव : मारुती गल्ली, अनगोळ येथील एका देवस्थानची दानपेटी फोडण्यात आली आहे. सोमवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. टिळकवाडी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून गेल्या सहा महिन्यांत याच देवस्थानात झालेला चोरीचा हा तिसरा प्रकार आहे. श्रावण सोमवारनिमित्त सकाळी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना व पुजाऱ्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. शिवरात्रीनंतर तब्बल तीनवेळा याच मंदिरातील दानपेटी फोडण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या चोरीच्या प्रकारामुळे दानपेटीचे संरक्षण करण्यासाठी लोखंडी जाळी बसवून कुलूप लावण्यात आले होते. जाळीला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटी फोडली आहे. त्यामधील रक्कम पळविण्यात आली आहे. यापूर्वी बेळगाव शहर व तालुक्यातील अनेक मंदिरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. दानपेटी फोडल्यामुळे भाविकांत खळबळ माजली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.