For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

श्वान आहे सोशल मीडिया स्टार

07:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्वान आहे सोशल मीडिया स्टार

महागडा ड्रेस परिधान करून देतो पोझ

Advertisement

सर्वसाधारणपणे माणसांना प्रतिष्ठा मिळविण्यासाठी मोठा कालावधी लागत असतो. परंतु एका श्वानाने हसत खेळत बरेच काही मिळविले आहे. हा श्वान सर्वोत्तम जीवन जगत आहे. या श्वानाच्या चाहत्यांची संख्या देखील कमी नाही. त्याच्या आलिशान जीवनाबद्दल ऐकून तुम्ही दंगच व्हाल. सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळविण्यासाठी लोक खूप काही करतात. परंतु एक छोटासा श्वान स्वत:च्या क्यूटनेसद्वारे फॉलोअर्स मिळवत आहे. त्याची लाइफस्टाइल पाहून कुणालाही मत्सर होऊ शकतो. हा श्वान विदेशांमध्ये फिरतो आणि तेथे स्वत:च्या मालकीणीसोबत फाइव्ह स्टारमध्ये राहतो. कॅनडाच्या टोरंटोमध्ये राहणारा बाओ नावाचा हा श्वान सोशल मीडियावर स्टार आहे.

तीन वर्षांचा चिनहुआहुआ प्रजातीचा हा श्वान स्वत:च्या मालकीणीसोबत विदेशात प्रवास करतो तसेच त्याच्याकडे 2 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा वॉर्डरोब आहे. तसेच त्याला नटून थटून छायाचित्रे काढून घेण्याचा छंद आहे. इन्स्टाग्रामवर असलेल्या या श्वानाची स्टाइल आणि फॅशनचे अनेक चाहते आहेत. बाओची मालकीण क्सा थी न्गोक ट्रान असून त्यांनी महामारीच्या काळात त्याला दत्तक घेतले होते. त्या बाओला स्वत:चे अपत्य मानतात. त्यांनी बाओला फ्रान्स, मेक्सिको, अल्बार्टा यासारख्या ठिकाणी नेले आहे. बाओच्या वॉर्डरोबमध्ये एकूण 75 कपडे असून यात ब्रँडेड स्कार्फ, जॅकेट, टर्टलनेक स्वेटर्स आणि शर्ट्सचा समावेश आहे. यातील अनेक कपडे त्याच्या मालकीणीशी मॅचिंग करणारे असतात. ट्रान यांनी बाओसाठी इन्स्टाग्राम अकौंट तयार केल्यावर लोकांची मोठी पसंती मिळाली. बाओचे आता 1 लाख 66 हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. याचबरोबर फेसबुकवर देखील बाओचे पेज आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.