For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भटक्या कुत्र्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची मोहीम केवळ कागदावर राहू नये

06:45 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
भटक्या कुत्र्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची मोहीम केवळ कागदावर राहू नये
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ हल्लेच नाही तर भटक्या कुत्र्यांचा उपद्रवही वाढला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या समस्येवर तोडगा काढत स्वतंत्र शेड बांधण्यासंदर्भात माहिती दिली होती. त्यामुळे त्यांचा हा उपक्रम कागदावर न राहता तो प्रत्यक्षात अमलात यावा, अशी मागणी ज्येष्ठ लेखक बी. एस. गवीमठ यांनी केली आहे.

केवळ बेळगावच नाही तर सर्वच शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचा चावा घेणे, दिवसरात्र भुंकणे, वाहनांचे नुकसान करणे तसेच कोणताही परिसर अस्वच्छ करणे असे प्रकार कुत्र्यांकडून सुरू आहेत. यामुळे नागरिक वैतागले आहेत. शहरात मागील आठवडाभरात दोन वृद्धांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात येत आहे. परंतु कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना हे उपाय कुचकामी ठरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी शेल्टर उभारून कुत्र्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.