Kolhapur News : जागा वाटपाचा तिढा सुटला ; काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट एकत्र लढणार
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस–शिवसेना एकत्र
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणूक काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट एकत्र लढणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाला. त्यांच्यामधील जागा वाटपाचा तिढा अखेर सुट
ला आहे. वरिष्ठांच्या बैठकीत ठाकरे गटाला सात जागा देण्यावर एकमत झाले. ठाकरे गटाने ५ व १७ या दोन्ही प्रभागांपैकी एका प्रभागात एक जागा मिळण्याची मागणी केली आहे. यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार होती. मात्र जागा वाटपावरून एकमत न झाल्याने आघाडीमधून राष्ट्रवादी शरद पवार गट, आप बाहेर पडले. त्यांनी तिसरी आघाडी करत महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. तरकाँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावरून चर्चासत्र सुरू होते. ठाकरे गट १७ जागांवर ठाम होता. मागणी केलेल्या जागा मिळत नसल्याने शिवसेनेनेही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा इशारा दिला होता.