महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तवडकर, वेळीप यांच्यातील वाद मिटला

06:09 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्र्यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी, वेळीपांनी केलेल्या आरोपांमुळे होता वाद

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

सभापती रमेश तवडकर आणि माजी उपसभापती प्रकाश वेळीप यांच्यातील वाद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मध्यस्थी केल्यामुळे सामोपचाराने मिटला आहे. सभापतींनी विधानसभेत काल शनिवारी वरील आशयाचे निवेदन केले आणि हा वाद मिटल्याचे सांगितले.

वेळीप यांनी सभापती तवडकर यांच्या नावाने कला-संस्कृती खात्याच्या निधी वितरणावरून काहीतरी वक्तव्य केले होते. त्याची दखल घेऊन अधिवेशन चालू असताना आरोप झाले म्हणून विशेषाधिकारांचा अपमान झाल्याचे नमूद करून तवडकर यांनी वेळीप यांना नोटीस (समन्स) बजावली होती आणि काल शनिवारी दुपारी विधानसभेत हजर राहाण्याचे निर्देश दिले होते.

सभापती वेळीप यांना कोणता जाब विचारणार? काय शिक्षा देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले हेते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच घडले नाही. वेळीप यांना दुपारी 3.30 वा. विधानसभेत हजर राहाण्यास फर्मावले होते परंतु तत्पूर्वेच तवडकर यांनी हा विषय संपुष्टात आल्याचे निवेदनातून स्पष्ट केले.

निवेदन करताना सभापती तवडकर म्हणाले की, वेळीप यांना देण्यात आलेल्या समन्सबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्याशी व वेळीप यांच्याशी चर्चा केली. निर्माण झालेला वाद आता संपला आहे.

यापूर्वी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे आणि तवडकर यांच्यात निधी वाटपावरून वाद झाला होता. त्या वादात वेळीप यांनी हस्तक्षेप केला आणि तवडकरांच्या शिक्षण संस्थांना दिलेल्या निधीची चौकशी व्हावी म्हणून मागणी केली होती. त्यावरून त्यांना सदर समन्स जारी करण्यात आले होते.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#tarunbharatnews
Next Article