कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अद्भूत ‘ममी’चा शोध

06:06 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑस्ट्रिया देशात एका ‘ममी’चा, अर्थात पुरातन मृतदेहाचा शोध लागला आहे. आतापर्यंत जगाच्या अनेक भागांमध्ये अशा अनेक ममीज सापडल्या आहेत. पण ही ममी या साऱ्यांहून भिन्न आणि वैशिष्ट्यापूर्ण असल्याने संशोधकांचे कुतुहल जागृत झाले असून ते या ममीचे सखोल संशोधन करीत आहेत. ही ममी एका ख्रिश्चन धर्मगुरुची आहे. या ममीला अशा प्रकारे संरक्षित करण्यात आले आहे, की इतक्या शतकांच्या नंतरही या ममीचे अनेक अवयव सुरक्षित राहिले आहेत.

Advertisement

या ममीच्या संरक्षणासाठी लाकूड, झाडांची साल, डहाळ्या, सुताचे धागे अशा पारंपरिक साधनांचा तर उपयोग करण्यात आलेलाच आहे. त्याखेरीज, झिंक क्लोराईड नामक एका रासायनिक पदार्थाचाही उपयोग करण्यात आला आहे. या रासायनिक पदार्थाच्या उपयोगाचे संशोधकांना विशेष आश्चर्य वाटत आहे. कारण हा पदार्थ आधुनिक काळात निर्माण करण्यात आला आहे, अशी समजूत आहे. ही ममी इसवीसन 1746 मधील आहे. त्या वर्षी ‘सेंक्ट थॉमस ब्लेसेंटिन’ नामक गावातील स्थानिक धर्मगुरु फ्रांझ जेवर सिडलर वॉन रोझनेग यांचे निधन झाले होते. नंतर त्यांच्या मृतदेहाची ममी बनविण्यात आली होती.

Advertisement

ही ममी अशा प्रकारे बनविण्यात आली आहे, की केवळ तिच्या धडाच्या खालचा भाग आणि डोक्याचा काही भाग सडला आहे. ऊर्वरित संपूर्ण शरीर जसेच्या तसे आहे. या धर्मगुरुने त्याच्या वयाच्या 23 व्या वर्षी पदभार स्वीकारला होता. ते 33 वर्षे या पदावर राहिले. सापडलेली ममी त्यांचीच आहे काय, यावर बराच वाद अनेक वर्षे होत राहिला होता. तथापि, आता कार्बन डेटिंग आणि इतर पुराव्यांच्या साहाय्याने संशोधकांनी हे सिद्ध पेले आहे, की ही ममी त्यांचीच आहे. जगातील सर्वाधिक सुरक्षित राहिलेली ममी अशी ख्याती आता तिला प्राप्त झाली आहे. यावरुन त्या काळातही विज्ञान प्रगत अवस्थेत होते विविध प्रकारचे रासायनिक पदार्थ निर्माण करण्याची मानवाची क्षमता त्याही काळात होती, हे स्पष्ट होत आहे. या संबंधात आता अधिक संशोधन केले जात असून अशा सुस्थितीत राहिलेल्या आणखी ममी आहेत काय, याचाही शोध घेतला जात आहे. या ममींच्या अभ्यासावरुन त्यावेळची जीवनपद्धती आणि संस्कृती यांचा वेध घेता येणे शक्य असल्याचे मत आहे. त्यामुळे अधिक संशोधनावर भर देण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article