‘मंजुम्मेल बॉयज’चा दिग्दर्शक बॉलिवूडमध्ये
मल्याळी चित्रपटाच्या प्रभावी दिग्दर्शकांपैकी एक चिदंबरम यांनी अकिडेच स्वत:चा चित्रपट ‘मंजुम्मेल बॉयज’द्वारे देशभरातून कौतुक मिळविले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मोठे यश मिळाले हेते. चिदंबरम आता दक्षिणेनंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चे दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून देणार आहे.
चिदंबरम याचा आगामी हिंदी चित्रपट हा गँगस्टर ड्रामा धाटणीचा असेल, ज्यात सूडाची रंजक कहाणी दाखविण्यात येणार आहे. चित्रपटातील कलाकारांची अद्याप निवड झालेली नाही, तसेच यासंबंधी कुठलीही अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाही.
चिदंबरमचा हा प्रोजेक्ट बॉलिवूडच्या प्रसिद्ध प्रॉडक्शन हाउसकडून निर्मिला जाणार आहे. यापूर्वी या प्रॉडक्शन हाउसने अग्ली, क्वीन, हँसी तो फँसी यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. चिदंबरमने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात 2021 मध्ये हिट चित्रपट ‘जान-ए-मन’द्वारे केली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर त्याने ‘मंजुम्मेल बॉयज’ नावाचा सर्वाइवरल थ्रिलर चित्रपट तयार केला होता. प्रेक्षकांसोबत समीक्षकांनाही हा चित्रपट अत्यंत आवडला होता.