डिप्लोमॅट 7 मार्चला होणार प्रदर्शित
जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत
जॉन अब्राहम लवकरच पुन्हा एकदा पॉवर-पॅक अॅक्शन चित्रपटात दिसून येणार आहे. द डिप्लोमॅट नावाच्या या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिजच्या सहकार्याने करण्यात आली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे.
साहस आणि कूटनीतिच्या या कहाणीला जिवंत करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला सन्मानित समजतो असे जॉनने म्हटले आहे. या चित्रपटात देशाला हादरवून टाकणारी एक सत्यकहाणी दर्शविण्यात येणार आहे.
जॉनचा हा चित्रपट 7 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. जॉनने यात एक उच्चपदस्थ अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट शिवम नायरककडुन दिग्दर्शित आहे. तर रितेश शाहने याची पटकथा लिहिली आहे.
हा चित्रपट यापूर्वी 11 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु निर्मात्यांनी याचे प्रदर्शन लांबणीवर टाकले होते. चाहते दीर्घकाळापासून याच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत होते. या चित्रपटाची निर्मिती जॉन अब्राहम, भूषण कुमार, समीर दीक्षित, अश्विन, राजेश बहल, विपुल शाह आणि कृष्णन कुमार यांनी मिळून केली आहे.