डिजिटल क्रांती आणि संवादाची शोकांतिका
नात्यांना पुनऊज्जीवित करण्यासाठी आणि संवादाची ही शोकांतिका टाळण्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनात काही छोटे पण अत्यंत महत्त्वाचे संकल्प करावे लागतील. रोजच्या धावपळीतून किमान काही वेळ ’डिजिटल डिटॉक्स’ पाळणे आवश्यक आहे. जेवताना, कुटुंबासोबत एकत्र बसताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ क्रीन पूर्णपणे बंद ठेवणे, एकत्र बसून गप्पा मारणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे, निसर्गात फिरणे यांसारख्या गोष्टींमुळे नात्यांमधील हरवलेला गोडवा परत येऊ शकतो.
नवी संस्कृतीच्या इतिहासात तंत्रज्ञानाने साधलेली प्रगती ही निवांतपणे विस्मयचकित करणारी आहे. एका क्लिकवर जग मुठीत आणणारी ‘डिजिटल क्रांती’ माणसाच्या जगण्याला गती, सुलभता आणि अथांग माहितीचा साठा देऊन गेली. परंतु, या लखलखत्या क्रांतीच्या दुसऱ्या बाजूला एक भीषण वास्तव लपलेले आहे... मानवी संवादाची हळूहळू होत चाललेली शोकांतिका. आज आपण अशा एका उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे तंत्रज्ञान हे मानवी प्रगतीचे एक वरदान मानले गेले असले, तरी त्याचा अतिरेक आणि विचारहीन वापर आपल्या मानवी संवेदना आणि परस्पर नात्यांचा बळी घेत आहे.
सध्याच्या डिजिटल युगात माणसाने यंत्रांना अफाट बुद्धिमत्ता दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्मार्टफोन, आणि वेगाने धावणारे इंटरनेट यांमुळे यंत्रे दिवसेंदिवस अधिक ‘हुशार’ होत गेली. पण या दुर्दैवी प्रवासात माणूस स्वत:चे ‘माणूसपण’ आणि ’जिव्हाळा’ गमावत चालला आहे, ही खरोखरच समाजासाठी एक गंभीर धोक्याची घंटा आहे. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत किंवा मित्रांच्या घोळक्यात जो गप्पांचा फड रंगायचा, एकमेकांच्या सुख-दु:खात डोळ्यांत पाहून जो हुंकार दिला जायचा, त्याची जागा आता इमोजी आणि संक्षिप्त मेसेजनी घेतली आहे. आपण दिवसभरात शेकडो मेसेज पाठवत असू, पण त्या संवादातील ’भाव’ आणि ’अर्थ’ मात्र पार वाळून गेला आहे.
क्रीनच्या लखलखाटात आज आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव आणि त्यांच्या डोळ्यांतील बोलकेपण अंधुक होत चालले आहे. एकाच छताखाली, एकाच डायनिंग टेबलवर किंवा एकाच खोलीत बसलेले चार-पाच कुटुंबीय एकमेकांशी बोलण्याऐवजी आपापल्या मोबाईल क्रीनमध्ये गढून गेलेले दिसतात. समोर बसलेली प्रत्यक्ष व्यक्ती अस्पष्ट होते आणि शेकडो मैल दूर असलेल्या व्हर्च्युअल जगातील अनोळखी व्यक्तीशी किंवा पोस्टशी आपण मानसिकदृष्ट्या जोडले जातो, हा विरोधाभास अत्यंत वेदनादायी आहे.
लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण या नीरव डिजिटल आघाताचा बळी ठरत आहे. लहान बालके आईचा मायेचा स्पर्श किंवा आजी-आजोबांच्या गोष्टी ऐकण्याऐवजी क्रीनवरील रंगीबेरंगी व्हीडिओंचे गुलाम होत आहेत. तऊणवर्ग सोशल मीडियावरील लाईक्स, ह्यूज आणि कमेंट्सच्या आधारे स्वत:चे मूल्य आणि यश ठरवू लागला आहे. डिजिटल विश्वातील ही खोटी प्रसिद्धी आणि तुलना प्रत्यक्ष आयुष्यात डिप्रेशन, नैराश्य आणि एकटेपणा वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. वृद्ध पिढी तर नात्यांमधील या डिजिटल अंतरामुळे आणि मुलांच्या व्यस्ततेमुळे स्वत:च्याच घरात कमालीची एकाकी पडत चालली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, पण वेळ अजूनही गेलेली नाही. आपण क्रीनचे निव्वळ गुलाम व्हायचे की तंत्रज्ञानाचे सुज्ञ वापरकर्ते बनून मानवी संवादाचा दीप जळता ठेवायचा, याचा निर्णय आज आणि आत्ताच घ्यावा लागेल. तंत्रज्ञान हे माणसाच्या सेवेसाठी निर्माण झाले आहे, माणूस तंत्रज्ञानाच्या सेवेसाठी नाही, याचे भान बाळगणे ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर कामापुरता, माहिती मिळवण्यासाठी आणि सोयीसाठी नक्कीच व्हावा; पण तो वापर जेव्हा आपल्या भावना, आपल्या संवेदना आणि नात्यांवर अतिक्रमण करू लागतो, तेव्हा त्याला वेळीच रोखणे हे सुजाण नागरिक म्हणून आपले आद्य कर्तव्य ठरते.
गुरुदास बी. नाटेकर