For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नावातच रहस्य असणारा डेव्हिल्स ब्रिज

06:50 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
नावातच रहस्य असणारा डेव्हिल्स ब्रिज
Advertisement

चकित करतो याचा आकार

Advertisement

जर्मनीतील आकर्षक ठिकाणांमध्ये डेव्हिल्स ब्रिजचा समावेश आहे. हा वास्तुकलेचा असाधारण नमुना आहे. या डेव्हिल्स ब्रिजचे जर्मनीत अधिकृत नाव राकोट्सब्रुक आहे. हा ब्रिज अनेक अनोख्या बाबींसाठी जगभरात ओळखला जातो. एवढेच नाही तर याच्या नावात देखील एक रहस्य आहे.

जर्मनीत याचे अधिकृत नाव ‘राकोट्सब्रुक’ असले तरीही हे खास नाव कुणी दिले हे स्पष्ट नाही. कारण ब्रुकचा अर्थ पूल होता, परंतु राकोट्सचा कुठलाच अनुवाद नाही. तर टेफेल या जर्मन शब्दाचा अर्थ सैतान असा होतो, यामुळे याला  टेफेलब्रुक देखील म्हटले जाते.  हा पूल पाण्यात स्वत:च्या प्रतिबिंबासोबत एक आकर्षक चक्र निर्माण करतो. हा कलेचा एक सुंदर नमुना आहे, परंतु स्वत:च्या वयामुळे आणखी प्रभावशाली ठरला आहे. आसपासचा निसर्ग या ब्रिजच्या सौंदर्या भर घालतो.

Advertisement

राकोट्सब्रुक वेगळा आहे, कारण तो अन्य ब्रिजच्या तुलनेत अत्यंत नंतर तयार करण्यात आला आहे, कारण त्यांना 1000 ते 1600 च्या शतकादरम्यान तयार करण्यात आले हेते. इंग्लंड आणि इटलीतही काही ब्रिज आहेत, परंतु जर्मनीत आढळून येणाऱ्या ब्रिजइतका मोठा ब्रिज तेथे निर्माण करण्यात आला नव्हता.  उर्वरित डेव्हिल्स ब्रिजची एकूण संख्या 49 आहे.

निसर्गाच्या नियमांना तोडणाऱ्या कुठल्याही गोष्टीची निमिर्ती सैतानानेच केली असावी असे मानले जात होते. अशा स्थितीत वास्तुकाराने सैतानासोबत तडजोड करत ब्रिज ओलांडणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा जीव घेण्याचे निश्चित केले होते. वास्तुकाराने एका श्वानाला पाठवून सैतानावर कुरघोडी केल्याचे काही लोकांचे मानणे आहे, तर वास्तुकाराने स्वत:च ब्रिज  ओलांडल्याचेही मानले जाते.

हा ब्रिज आता सर्वसामान्य लोकांसाठी खुला नाही. हा ब्रिज आगामी पिढ्यांसाठी संरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि सध्या या ब्रिजचे नुतनीकरणाचे कार्य सुरू आहे. हा ब्रिज दुरून पाहता येतो, परंतु याला स्पर्श करता येत नाही. ऑगस्टचा महिना हा ब्रिज पाहण्यासाठी आदर्श मानण्यात येतो.

Advertisement
Tags :

.