For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली उच्च न्यायालयाचा भाजप नेते दुष्यंत कुमारांना दिलासा

06:52 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली उच्च न्यायालयाचा भाजप नेते दुष्यंत कुमारांना दिलासा
Advertisement

वृत्तसंस्था/ दिल्ली

Advertisement

अंकिता भंडारी हत्येप्रकरणी भाजप नेते दुष्यंत कुमार गौतम यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस, आप आणि इतरांना दुष्यंत कुमारांना अंकिता भंडारी हत्याप्रकरणाशी जोडणारा कंटेंट पोस्ट करण्यापासून रोखले आहे. तसेच न्यायालयाने अशाप्रकारच्या पोस्ट 24 तासांच्या आत हटविण्याचा निर्देश दिला आहे.

दुष्यंत कुमार गौतम यांनी याप्रकरणी मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयाने उर्मिला सनावर आणि उत्तराखंड प्रदेश काँग्रेस समितीसमवेत अन्य लोक तसेच संस्थांच्या विरोधात अंतरिम आदेश दिला आहे. गौतम यांची बदनामी करणाऱ्या कंटेंटच्या होस्टिंगला रोखण्याचा अंतरिम आदेश न दिल्यास भरपाई न होऊ शकणारे नुकसान होऊ शकते. 24 तासांच्या आत कंटेंट हटविण्यात न आल्यास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नियमांनुसार तो हटवतील असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

2022 साली उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यातील वनतंत्र रिजॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या 19 वर्षीय अंकिता भंडारीची हत्या करण्यात आली होती. रिजॉर्टचे मालक पुलकित आर्य आणि दोन कर्मचारी सौरभ भास्कर तसेच अंकित गुप्ता यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.