For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीतील आग : दुर्दैवी तेवढीच भयानक

06:30 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीतील आग   दुर्दैवी तेवढीच भयानक
Advertisement

‘लेमन ग्रीन“ हॉटेलमध्ये अग्नि सुरक्षेसंदर्भातील नियमांचे सरळ सरळ उल्लंघन केलेले दिसून येते. अग्निशमन दलाने सुरक्षे संदर्भातील परवानगी या हॉटेलला नाकारण्यात आली होती. असे असताना या हॉटेलला परवानगी दिलीच कशी ? कोणी दिली? एवढे दिवस हॉटेल चालले कोणाच्या आशीर्वादाने? याची देखील चौकशी गरजेची आहे आणि संबंधितांविरोधात कारवाई देखील आवश्यक आहे.

Advertisement

दिल्लीच्या मालवीय नगर येथील लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत एकूण 21 नागरिक होरपळून मरण पावले आणि त्यातील 18 जण हे विदेशातील होते, ही त्यापेक्षा एक भयानक घटना ठरते. दिल्ली हे देशातील राजधानी शहर आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या राज्याला व राजधानीला फार महत्त्व आहे. जगातील अनेक राष्ट्रांमधून माणसे दिल्लीमध्ये येत असतात तेव्हा हे शहर म्हणजे भारताचे प्रतीक मानले जाते, अशावेळी या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांचे व्यवस्थित स्वागत तर व्हावेच शिवाय त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे हे या देशातील सरकारचे कर्तव्य आहे. ज्या

हॉटेलमध्ये आग लागली त्या हॉटेलची चौकशी यानंतर सुरू होईल. परंतु एकापेक्षा एक अनेक महत्त्वाच्या घडामोडी त्यातून सुरू झाल्या. अर्थात राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केलेले आहेत. त्याहीपेक्षा या हॉटेलला परवानगी देताना तिथे येणाऱ्या पाहुण्यांची किंवा ग्राहकांची सुरक्षा विचारात घेतली होती की नाही ! हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कारण या हॉटेलमध्ये अग्नि सुरक्षेसंदर्भात नियमांचे सरळ सरळ उल्लंघन केलेले दिसून येते. हॉटेल जेव्हा सुरू करण्यात येते त्या हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे, ग्राहकांच्या सुरक्षेचे सर्व उपाय हॉटेल चालकाने हाती घेणे गरजेचे असते. जोपर्यंत सर्व नियमांचे पालन होत नाही तोपर्यंत संबंधीत हॉटेल व त्याच्या रेस्टॉरंटला परवानगी देणे हा देखील एक गुन्हाच ठरतो. त्यामुळे साहजिकच दिल्ली सरकारवर त्याचा दोषारोप येतो. 2024 मध्ये या हॉटेलला परवानगी देण्यात आली. अग्निशमन दलाने सुरक्षा संदर्भातील परवानगी या हॉटेलला नाकारण्यात आली होती. असे असताना या हॉटेलला परवानगी दिलीच कशी? कोणी दिली? याची देखील चौकशी गरजेची आहे.  गेल्या पाच दिवसात आगीच्या सुमारे तीन घटना दिल्लीमध्ये घडलेल्या आहेत. लेमन ग्रीन रेस्टॉरंटला परवाना नव्हता. या

Advertisement

हॉटेलमध्ये केवळ सहा खोल्यांनाच परवानगी होती. प्रत्यक्षात मात्र हॉटेल चालक 25 खोल्या चालवत होता. म्हणजेच सरकार गंभीर नव्हते. जेव्हा हे हॉटेल चालू झाले, त्यावेळी दिल्लीमध्ये आम आदमीचे सरकार होते आता त्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे. सरकार कोणाचेही असो, सरकार ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे भाजपने आम आदमी पक्षावर आणि आम आदमीने भाजपवर टीका केली, यात काही अर्थ नाही. ज्या 21 नागरिकांचा बळी गेला त्याला जबाबदार कोण ? या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या अशा दुर्घटना घडणे म्हणजेच आपल्या देशाचे नाक कापले जाते याची जाणीव देखील असणे गरजेचे आहे. ही बातमी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आणि त्यातून भारताची बदनामी झालेली आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी या हॉटेल संदर्भात जी माहिती उघड केलेली आहे, ती अत्यंत धक्कादायक आहे. हॉटेलला एकच दार होते, प्रवेशद्वारही तेच आणि बाहेर पडण्यासाठीचा मार्ग देखील तेच दार होते. अग्निशमन दलाने सुरक्षेसंदर्भातील ना हरकत परवाना दिला नव्हता. ज्या भागात आग लागली त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग देखील चिंचोळाच आहे. आग लागल्यानंतर बऱ्याच वेळेनंतर अग्निशमन दलाची गाडी पोहोचली. तोपर्यंत अनेकजणांनी आपले प्राण गमविले होते. अशा घटना घडल्यानंतरही सरकार जागे कसे होत नाही याचे आश्चर्य वाटते. या घटना म्हणजे डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत. दिल्लीत बुधवारच्या घटनेने साऱ्या यंत्रणांचे कारनामे उघडे पडले. देश आज आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रगतीपथावर पोहोचलेला आहे असे असताना देशात अशातऱ्हेच्या घटना घडणे म्हणजे देशाच्या प्रगतीला अत्यंत मारकही आहेत, आणि घातकही आहेत. दिल्लीमध्ये काही वर्षांपूर्वी एका सिनेमागृहाला लागलेल्या आगीत असंख्य माणसे होरपळून मरण पावली होती, त्याची याद करणारी ही दिल्लीतील आणखी एक दुर्दैवी मोठी घटना ठरते. या घटनेतून सरकारी यंत्रणेचा गलथानपणा उघडा पडला आहे. सरकारी यंत्रणेचे होत असलेले दुर्लक्ष आणि ओंगळवाणा कारभार यामुळेच 21 जणांचे प्राण गेले आणि ते देखील देशाच्या राजधानीमध्ये. आता तरी केंद्राला आणि राज्यांना या प्रकरणातून जाग येईल का ? दिल्लीतील हॉटेलच्या घटनेच्या झळा मात्र देशभरात सर्वत्र पोहोचल्या.

माझ्या आजीकडून एक म्हण मी बऱ्याचवेळा ऐकलेली आहे. ती म्हणजे ‘माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं’! त्यावेळेला आम्हाला या यमक जुळणाऱ्या शब्दाची मोठी मजा वाटायची. त्याच्यामुळे आम्ही आजीची चेष्टा करायचो. आजी चिडायची आणि म्हणायची मोठी झालात की माझ्या म्हणण्यामागचे अर्थ तुम्हाला कळतील. यथावकाश आम्ही मोठे झालो. भ्रांती म्हणजे काय ते चांगलंच कळायला लागलं.

Advertisement
Tags :

.