कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तेंडोली-भोमवाडी अनलादेवीचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उद्या

03:02 PM May 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वार्ताहर/कुडाळ

Advertisement

तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा ५ ते १० मे याकालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.५ रोजी सकाळी ७ वाजता प्रायश्चित्त विधी, देवतावंदन, गाऱ्हाणे, संकल्प, संभारदान, पुनः संकल्पपूर्वक वेदोक्त, पुण्याह‌वाचन, स्थलशुध्दी, शांतीहोम, मंडप प्रवेश, मंडप प्रतिष्ठा, गणेश यागांग भूत सहस्रावर्तन, श्री गणपती अधवशीर्ष, जप-हवन, मूर्तीना धान्याधिवास, दुपारी १.३० वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ६ वाजता किर्तनकार-राजू मुंडले (तेंडोली) यांचे किर्तन,रात्री ८.३० वाजता श्री देव रवळनाथ मंडळ (तेंडोली) यांचे 'शांतेच कार्ट चालू आहे' दोन अंकी विनोदी नाटक, ६ रोजी सकाळी ७.३० वाजता मूर्तीना जलाधिवास, ब्रह्मादिमंडल देवता स्थापन, वास्तुस्थापन, योगीनी स्थापन, क्षेत्रपाल-भैरवस्थापन, दुपारी १.३० वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ६ वाजता किर्तनकार-मकरंद देसाई (तेंडोली) यांचे किर्तन,रात्री ८.३० वाजता चिमणी पाखरं डान्स अॅकॅडमी (कुडाळ ) यांचा ४० कलाकार, गणेश वंदना विथ स्टेज प्रॉपर्टी, लावणी स्टेज प्रॉपर्टी, मानवी देखावे, शिवराज्याभिषेक सोहळा, मिमिक्री, पुष्पा २ कालिमाता देखावा, बाळुमामा दर्शन नृत्य, वेस्टर्न डान्स, टीव्ही प्रमाणे प्रोफेशनल नृत्य,श्रीरामअयोध्या देखावा, कांतारा देखावा, झी मराठी फेम ड्रामा ज्युनिअर फायनालिस्ट आरव आईरचा खास परफॉर्मन्स,७ रोजी सकाळी ७.३० वाजता स्थापित देवता पूजन, उत्तर जन्नाधिवास पूर्ण, शैयाधिवास, अग्नीस्थापन, ग्रहस्थापन, वास्तुहवन, ग्रहयण्य अग्निप्रणयन, देवी अथर्वशीर्ष जप, प्रतिकुंडात दशांश हवन, मुख्य कुंडात पर्याय हवन,दुपारी १.३० वाजता नैवेद्य, प्रसाद,सायंकाळी 6 वाजता रामकृष्ण हरी संगीत गुरुकुल ( तेंडोली) यांचा स्वरसंध्या कार्यक्रम, रात्री 8.30 वाजता श्री गावडोबा, कलेश्वर राधानृत्य (रायवाडी) यांचे रोबाटनृत्य, ८ रोजी सकाळी 7.30 वाजता स्थापित देवता पूजन,अग्निपूजन, हवन,देवप्रबोध,पिंडीकान्यास,दुपारी 1.30 वाजता नैवेद्य व प्रसाद,सायंकाळी ५.३० वाजता श्री देव रवळनाथ पंचायतन देवतांचे तरंग पालखीसह आगमन, 6 वाजता बुवा-अनिल पांचाळ, बुवा-रुपेंद्र परब, बुवा-सुंदर मेस्त्री यांची संगीत जुगलबंदी,रात्री 8.30 वाजता ओम शिव शंभो घुमट आरती मंडळ (मेरशी,तिसवाडी-गोवा) यांचे घुमट वादन, 9 मे रोजी सकाळी ७.३० वाजता स्थापित देवता पूजन, अग्निपूजन, तत्वहवन, युपपुजन, तत्वन्यास, 8.30 वाजता मुहूर्तावर श्री अनलादेवी आदी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा,लघुरुद्र,अभिषेक,बलिदान, पूर्णाहूती,प्रार्थना,आशीर्वाद,दुपारी1.30 वाजता नैवेद्य, महाप्रसाद, 3 वाजता हळदीकुंकू, सायंकाळी ५.३० वाजता ग्रामस्थाची भजने, सायंकाळी 7.30 वाजता रामकृष्णा हरी महिला भजन सेवा संघ (तेंडोली) यांचे भजन,रात्री 8.30 वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री 10 वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक,१० मे रोजी सकाळी ६ वाजता धार्मिक विधी, लघुरुद्र, अभिषेक, दुपारी १.३० वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी 5 वाजता श्री देव रवळनाथ पंचायत स्वारीचे स्वस्थानी प्रयाण होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन अनलादेवी सेवा मंडळ (तेंडोली) यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article