For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनेशसंदर्भातील निर्णय आज होणार

06:41 AM Aug 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
विनेशसंदर्भातील निर्णय आज होणार
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने भारतीय महिला मल्ल विनेश फोगाटबाबतचा निर्णय लांबणीवर टाकला असून रविवारी 11 रोजी त्या संदर्भात निर्णय देणार असल्याचे सांगण्यात आले.

29 वर्षीय विनेशला वजन जास्त भरल्याने अंतिम लढतीआधी अपात्र ठरविण्यात आले. त्या संदर्भात क्रीडा लवादाकडे विनेशने अपील केले होते. त्याचा निर्णय शनिवारी देणार जाहीर करण्यात आले होते. पण लवादाच्या अॅडहॉक विभागाने लवादाचे एकमेव मध्यस्थ डॉ. अॅनाबेल बेनेट हा निर्णय आता रविवारी संध्याकाळी सहा वाजता घेणार असल्याचे आयओएने निवेदनात सांगितले आहे. मात्र 13 ऑगस्ट रोजी हा निर्णय सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे आयओएमधील सूत्रांनी स्पष्ट केले. आज रविवारी ऑलिम्पिकची सांगता होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.