सत्ताधारी जिथे चुकतील ; दहशत माजवतील , तिथे आपण लढूया
सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार
सावंतवाडी प्रतिनिधी
जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र होऊन पुन्हा जोमाने कामाला लागूया. आपल्याला जनतेने विरोधी पक्ष म्हणून निवडला आहे. तर आता जनतेच्या अपेक्षेनुसार आपण काम करूया. सत्ताधारी जिथे चुकतील, जिथे दहशत सुरू होईल तेथे आपण लढूया असे सावंतवाडी तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्धार करण्यात आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर ,राजन तेली ,सतीश सावंत ,संदेश पारकर ,बाबुराव धुरी, रुपेश राऊळ ,मायकल डिसोजा ,शब्बीर मणियार, रमेश गावकर, मंदार शिरसाट, आशिष सुभेदार ,रमेश सावंत. ,भारती कासार, श्रुतिका दळवी, आधी पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . आजच्या बैठकीत आपण सर्वांनी पराभव विसरून पुन्हा एकदा जनतेपर्यंत पोहोचू. सत्ताधारी काय करतात ते आपण पाहूया . सत्ताधारी जिथे चुकत असतील तेथे आपण लढायचं आहे असे बैठकीत ठरवण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक म्हणाले कुडाळ येथे यांची दहशत सुरू झाली आहे. त्यामुळे जनतेला आता त्यांचे रूप समजणार आहे. त्यामुळे आपण जनतेच्या पाठीशी ठाम उभे राहूया असे स्पष्ट केले.