For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राम मंदिराचा निर्णय रद्द होणार होता!

06:22 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
राम मंदिराचा निर्णय रद्द होणार होता
Advertisement

अयोध्येतील रामजन्मभूमीचे स्थान हिंदूंना भगवान रामलल्लांच्या मंदिरासाठी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय रद्द करण्याची योजना राहुल गांधी यांनी तयार केली होती, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचेच पूर्वीचे नेते प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या रामासंबंधीच्या अशा विचारांमुळे मी काँग्रेस पक्षाचा त्याग केला, असेही कृष्णम यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय रद्द केला जाईल, असे राहुल गांधी यांनी या निर्णयानंतर झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते. ही बैठक राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांनी आयोजित केली होती. मी 32 वर्षे काँग्रेसमध्ये होतो. त्या पक्षासाठी मी बरेच काम केले आहे. तथापि, राममंदिरासंबंधीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेसची विरोधाची भूमिका पाहून माझा काँग्रेससंबंधी भ्रमनिरास झाला, असे प्रतिपादन त्यांनी केले होते.

अमेरिकेतील हितचिंतकाची सूचना

Advertisement

भगवान प्रभू रामचंद्रांसंबंधीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करावा, ही सूचना राहुल गांधी यांना त्यांच्या अमेरिकेतील एका हितचिंतकाने केली होती, असे त्यांनी सॅम पित्रोदा यांचा उल्लेख न करता स्पष्ट केले. ज्यावेळी भगवान रामलल्लांच्या मंदिरात त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या सोहळ्याची सज्जता केली जात होती, त्यावेळी पित्रोदा यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. या सोहळ्याला इतके महत्व का दिले जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्याचा संदर्भ कृष्णम यांनी सोमवारी केलेल्या विधानाला देण्यात आला आहे.

पक्षनेतृत्वावर टीका

काँग्रेसच्या नेत्यांनी भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले होते. नेत्यांच्या या निर्णयावर कृष्णम यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करुन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसने नंतर त्यांना पक्षातून निलंबित केले होते.

Advertisement
Tags :

.