For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jotiba Donger | दख्खननगरी भाविकांनी फुलली! बेळगावच्या मानाच्या सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल

02:54 PM Mar 30, 2026 IST | NEETA POTDAR
jotiba donger   दख्खननगरी भाविकांनी फुलली  बेळगावच्या मानाच्या सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल
Advertisement

                 श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीत लाखो भाविकांची हजेरी

Advertisement

जोतिबा डोंगर -महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री क्षेत्र बाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील जोतिबाची यात्रा बुधवार १ एप्रिल रोजी होत आहे. रविवारी कामदा एकादशी पासुन चैत्र यात्रेस प्रारंभझाला. बेळगाव, लातूर, बार्शी, सांगली, सोलापूर, पंढरपूर, बिड, सातारा, पुणे परिसरातील काही सासनकाठ्या डोंगराबर दाखल झाल्या आहेत. संपूर्ण डोंगर परिसर भाविकांनी फुलला आहे. हालगी, पिपाणीच्या तालावर नाचणारे भाविक, जोतिबाच्या नावाने चांगभलंचा अखंड गजर यामुळे दख्खननगरीतील उत्साहमय बनत आहे.

चैत्र पौर्णिमच्या अगोदरच्या रविवार भक्तीमय वातावरणात श्री जोतिबाचा रविवार संपन्न झाला. महाराष्ट्र कर्नाटकातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले. यावेळी श्रीस महाभिषेक, महापोशाख घार्मिक विधी, धुपारती सोहळा, पालखी सोहळा उत्साहात करण्यात आला.श्री क्षेत्र जोतिबाबर परंपरेनुसार बेळगाव येथील चव्हाट गल्ली व नार्वेकर गल्लीतील सासनकाठ्यानंदी, नगारा, बैल गाड्या, डोक्यावर जोतिबाची चांदीची मूर्ती घेऊन निगवे दुमाला, कुशीरे फाटा मार्गे गायमुख तलावा शेजारी असणाऱ्या श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिरात दर्शन घेऊन दक्षिण दरवाजा मार्ग, जोतिबा मंदिराच्या आवारात दाखल झाल्या.

Advertisement

परंपरेनुसार गोतिबा येथील ग्रामस्थांनी सासनकाठीच्या सर्व भाविकांचे स्वागत व मानपान केले. बेळगावच्या भक्तांनी पारंपरिक पध्दतीनेमंदिराभोवती सासन काठीच्या पाच प्रदक्षिणा काढून श्रीचे व सर्व देव देवतांचे कुलाचार पद्धतीने दर्शन घेतले. यावेळी भक्तांनी चांगभलंचा गजर व गुलाल खोबऱ्याची मोठी उधळण मंदिर परिसरात केली.

दरम्यान आज बीड लातूर, पंढरपूर, सोलापूर, सांगली, सातारा पुणे, उस्मानाबाद बीड परिसरातील काही लहान मोठ्या सासनकाठ्या खासगी वाहनाने व एसटी बसने जोतिबा नगरीत दाखल झाल्या. यावेळी भाविकांना प्रसाद म्हणून व श्रमपरिहार म्हणुन गुळ, पाणी, चिरमुरे, लाडु, सरबत, ताक लस्सी देण्याची व्यवस्था काही भक्तांनी केली.

श्रीं च्या मंदिरात धार्मिक विधी व मंत्रपठण केरबा उपाध्ये, शरद बुरांडे, बंडा उमराणी, हरिदास उपाध्ये, प्रकाश उपाध्ये, यांनी केले तसेच डबरी गीते गजानन डवरी, मच्छिंद्र डबरी, यांनी म्हंटले. तर श्रीच्या मंदिरात धार्मिक विधी, मंत्रोच्चार केरबा उपाध्ये, प्रकाश उपाध्ये, बंडा उमराणी, शरद बुराडे कमलाकर उपाध्ये सुरज उपाध्ये सुमित उपाध्ये यांनी केले. दरम्यान पहाटे घंटानाद करून श्रीच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर श्री ची पाद्यपूजा व काकडआरती करण्यात आली. त्यानंतर जोतिबा देवाबरोबर नंदी, महादेव, चोपडाई काळभैरव, रामलिंग, यमाई, दत्त, या देवांना महाभिषेक घालून, आकर्षक सुवर्णालंकारित महापूजा बांधण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधी करून धुपआरती करून महानैवेद्य दाखवण्यात आला.

त्यानंतर दिवसभरभाविकासाठी मंदिर दर्शनासाठी खुले केले. रात्री साडे आठ वाजता उंट, घोडा बाजंत्री, देवसेवक, हुद्देवाले, कंचाळवादक, डवरी, ढोली, म्हालदार व श्रीं चे पुजारी तसेच देवस्थान समितीचे अधिकारी धैर्यशील तिवले व कर्मचारी तसेच सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्ट समितीचे अधिकारी अजित झुगर व कर्मचारी असा लवाजमा सोहळा 'पालखी' सोहळ्यासाठी निघाला.

Advertisement
Tags :

.