टॉऊन हॉलमध्ये मिळून आलेल्या विवाहितेचा मृत्यु
कोल्हापूर :
शहरातील टॉऊन हॉल उद्यानात एक विवाहिता शुध्द हरविलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आली होती. तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. पण उपचारादरम्यान तिचा मंगळवारी दुपारी मृत्यु झाला. रेश्मा गणेश खाडे (वय 28, रा. विठ्ठलवाडी, कसारा, जि. ठाणे) असे तिचे नाव आहे. तिचा मृत्यु नेमका कशामुळे झाला. यासाठी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पण यामध्ये तिचा मृत्युच्या कारणाचा उलगडा न झाल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
रेश्मा खाडे हिला दोन मुले असून, तिचा मोठा मुलगा दुसरीच्या तर लहान मुलगा पहिल्याच्या वर्गात शिकत आहे. बुधवारी (4 डिसेंबर) सकाळी ती मुलांना शाळेत सोडण्यासाठी म्हणून राहत्या घरातून मुलांना बरोबर घेवून बाहेर पडली. मुलांना शाळेत सोडल्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोधाशोध केली. पण तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार कसारा (जि. ठाणे) पोलीस ठाण्यात दाखल केली. गेल्या पाच दिवसापासून पोलीस आणि तिचे नातेवाईक तिचा शाध घेत होते. याचदरम्यान ती सोमवारी (9 डिसेंबर) सकाळी शहरातील टॉऊन हॉल उद्यानात लक्ष्मीपूरी पोलिसांना शुध्द हरविलेल्या अवस्थेत मिळून आली. त्यामुळे पोलिसांनी तिला उपचारासाठी तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. तिच्याकडे असलेल्या ओळखपत्रावऊन पोलिसांनी कसारा पोलिसांच्या बरोबर संपर्क साधून, त्याना बेपत्ता रेश्मा खाडे ही विवाहिता शुध्द हरविलेल्या अवस्थेत मिळून आली असून, तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केल्याबाबतची माहिती दिली. त्यावऊन कसारा पोलीस आणि तिच्या नातेवाईकांनी तत्काळ सीपीआरमध्ये धाव घेतली.