For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र खो-खो मध्ये ‘नव्या युगाची‘ सुरुवात!

06:09 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र खो खो मध्ये ‘नव्या युगाची‘ सुरुवात
Advertisement

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध!

Advertisement

पुणे, दि. 5 एप्रिल : ‘

खेळ बदलेल, दिशा बदलेल!’ अशा उत्साहात महाराष्ट्र खो-खो विश्वात आज ऐतिहासिक क्षण घडला, जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर झाली! खो-खो, कब•ाr, कुस्ती आणि मल्लखांबसारख्या परंपरागत खेळांमध्ये राज्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला विराजमान झाल्याने हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे.

Advertisement

इतिहासाची नोंद : पहिली महिला अध्यक्ष, नवा अध्याय सुरू!

सुनेत्राताई अजित पवार यांची निवड ही केवळ पदभरती नसून, महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासातील मोठी झेप मानली जात आहे. यापूर्वी हॉकी आणि रायफल संघटनांमध्ये महिला अध्यक्ष होत्या; मात्र खो-खो क्षेत्रात अनेक वर्षांनी हा सन्मान महिलेला मिळाला आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदावर सुनेत्राताईंनी एकहाती बाजी मारत नवा अध्याय सुरू केला आहे.

निवडणूक प्रक्रिया: एकच अर्ज, थेट बिनविरोध विजय!

5 एप्रिल रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदासाठी निवडणूक अपेक्षित होती. मात्र, अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. धीरज कोल्हे यांनी अधिकृत घोषणा करताच सभागृहात उत्साहाची लाट उसळली. या वेळी लोकेश्वरा (उपाध्यक्ष, भारतीय खो-खो महासंघ व कर्नाटक असोसिएशन) आणि प्रदीप खांडरे (महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन) निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

टाळ्यांचा कडकडाट: अभिनंदनांचा वर्षाव!

अॅड. धीरज कोल्हे यांनी निवडीची घोषणा करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आनंदाचा जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुनेत्राताई अजित पवार यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

नव्या नेतृत्वाकडून अपेक्षा : खो-खोला नवी उंची!

‘नेतृत्व बदलले की दिशा बदलते’ याच आशेने आता महाराष्ट्रातील खो-खो विश्व नव्या उंचीच्या प्रतीक्षेत आहे. सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील खेळाडूंना अधिक संधी, उत्तम सुविधा आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एकंदरीत, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी झालेली ही बिनविरोध निवड म्हणजे केवळ बदल नाही, तर ‘महिला नेतृत्वाच्या युगाची‘ दमदार सुरुवात आहे!

Advertisement
Tags :

.