For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुलीनेच केले आईवर अंत्यसंस्कार

10:31 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुलीनेच केले आईवर अंत्यसंस्कार
Advertisement

खानापूर : मूळच्या करंबळ सध्या कारलगा येथील रहिवासी प्रभावती शंकर कवळेकर यांना दोन मुलीच असल्याने आपल्या वृद्धापकाळात त्या अमृता काद्रोळकर या मुलीकडे कारलगा येथे रहात होत्या. अमृता आईची सेवा करत होती. शनिवार दि. 24 रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना मुलगा नसल्याने अंत्यसंस्कार कोणी करायचे यावर बराच वेळ चर्चा झाल्याने मुलीनेच अंत्यसंस्कार करावे हे ठरवण्यात आल्यानंतर याला समाजबांधव आणि गावकऱ्यांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्या मूळगावी करंबळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराचा विधी मुलगी अमृता कांद्रोळकर यांनी पार पाडला.

Advertisement

Advertisement
Tags :

.