राज्यातील पुराचा धोका टळला
दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा: पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
पणजी : पावसाचे प्रमाण आता थोडे कमी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी गोव्यात काही ठिकाणी मध्यम तथा जोरदार पाऊस पडून गेला. पणजीत पावसाचा जोर मंदावला मात्र रात्री उशिरा हलक्या प्रमाणात सुऊ झालेला पहाटेपर्यंत चालू होता. आगामी 48 तासांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, राज्यातील पूरस्थिती पूर्णत: निवळली असून नद्यांची पातळी देखील पात्रामध्येच आहे व पूरधोका आता पूर्णत: गेलेला आहे. बुधवारच्या मुसळधार पावसामुळे गुऊवारी पहाटे गोव्याच्या विविध भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर शुक्रवारी पावसाचा जोर मंदावला व नद्यांची पातळी देखील आटोक्यात आली. या पुरामुळे जे नुकसान झालेले आहे. त्याचा आढावा दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतला जात आहे. पावसाची परिस्थितीही शुक्रवारी सुधारलेली दिसली. दिवसभरात ढगाळ वातावरण होते मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. आज व उद्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
24 तासांत 2.5 इंच पाऊस आतापर्यंत 126 इंचाची राज्यात नोंद
गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात आणखी 2.5 इंच पावसाची नोंद पडल्याने यंदाच्या मौसमातील आतापर्यंत पडलेल्या 60 दिवसांतील पावसाची इंचात नोंद 126 एवढी झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 56 टक्के जादा पाऊस यंदा पडलेला आहे. यंदा 45 इंच जादा पाऊस पडलेला आहे. अख्ख्या मौसमात म्हणजे 1 ऑक्टोबरपर्यंत कैकवेळा 105 ते 108 इंच नोंद होत असे. यंदा जुलैच्या अखेरीस एवढी नोंद झालेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 4.75 इंच पाऊस सांगेमध्ये झाला. सांगेमध्ये यंदाच्या मौसमात सर्वाधिक 150.50 इंच पाऊस झालेला आहे.
म्हापसा येथे गेल्या 24 तासांत 1.5 इंच, पेडणे 2.50 इंच, फोंडा 2 इंच, पणजी 1 इंच, जुने गोवे 2 इंच, सांखळी 2 इंच, वाळपई 3.50 इंच, काणकोण 3.5 इंच, दाबोळी 1 इंच, मडगाव 2.50 इंच, मुरगाव 1 इंच, पेपे 3.50 इंच एवढी पावसाची नोंद झाली. वाळपईतील 3.50 इंच पावसामुळे यंदाच्या मौसमात तिथे पडलेल्या पावसाची नोंद आता 157 इंच एवढी झाली आहे. सांखळी येथे 140 इंच तर केपे येथे 134 इंच पाऊस आतापर्यंत पडला. हवामान खात्याने सायंकाळी ऑरेंज अलर्ट जारी कऊन काही भागात जोरदार पाऊस पडणार असा इशारा दिला आहे. दि. 7 व दि. 8 ऑगस्ट रोजी ग्रीन अलर्ट जारी केला आहे व हलक्या स्वऊपात पाऊस पडेल असे जाहीर केले आहे. पुढील तीन दिवसानंतर राज्यातील जनतेची पावसापासून सुटका होईल, असेच दिसते.